'आमच्यासारख्यांना कोणी पार्टीत बोलवत नाही'; शरत सक्सेनाने उघड केलं बॉलिवूडचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 14:50 IST2023-05-29T14:49:31+5:302023-05-29T14:50:10+5:30
Sharat saxena: अलिकडेच शरत सक्सेना यांनी एक मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडविषयीचे अनेक खुलासे केला.

'आमच्यासारख्यांना कोणी पार्टीत बोलवत नाही'; शरत सक्सेनाने उघड केलं बॉलिवूडचं सत्य
बॉलिवूड अभिनेता शरत सक्सेना (sharat saxena) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहेत. शरत यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, तरीदेखील त्यांना म्हणावं तसं बॉलिवूडमध्ये यश मिळालं नाही.याविषयी अलिकडेच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना अन्य कलाकारांकडून कशी वागणूक मिळाली हे त्यांनी उघड केलं. तसंच बॉलिवूडमध्ये होणाऱ्या पार्ट्यांविषयीदेखील मत मांडलं.
अलिकडेच शरत सक्सेना यांनी एक मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडविषयीचे अनेक खुलासे केला. यात मला कोणीही बॉलिवूड पार्ट्यांमध्ये बोलवत नाही असं सांगितलं. तसंच अभिनेत्री रेखा यांच्या स्वभावाविषयीदेखील भाष्य केलं.
"नाही हो. आम्हाला कोणी पार्ट्यांमध्ये बोलवतच नाही. या पार्ट्या स्टार्ससाठी असतात आणि, हे स्टार्स सध्या एका वेगळ्या ताऱ्यावर आहेत. ते वेगळ्याच स्तरावर असतात. हे स्टार्स फक्त दुसऱ्या स्टार्ससोबतच बोलतात, त्यांच्याशी गप्पा मारतात. त्यांच्यासोबत जेवतात, पार्टी करतात", असं शरत सक्सेना म्हणाले.
पुढे ते म्हणतात, आम्ही केवळ कलाविश्वाचा एक भाग आहोत. हा कलाविश्वाचा असा भाग आहे ज्याच्याविषयी लोकांना फार माहिती नाहीये. आम्ही लोकं फक्त सिनेमाच्या शुटिंगच्या वेळीच भेटतो. आणि, जसं शुटिंग संपतं आम्ही निघून जातो. आमचं त्यांच्यासोबत एवढंच नातं आहे.
दरम्यान, शरत यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमा दिले. यात ऐतबार, मुजरिम, नन्हें जैसलमर, गुलाम, मिस्टर इंडिया, तुमको ना भूल पाएंगे, फिर हेरा फेरी, बजरंगी भाईजान, भागम भाग या सिनेमात काम केलं आहे. शरत विद्या बालनच्या शेरनी या सिनेमात अखेरचे झळकले होते.