श्रिया पिळगावकर ह्या ठिकाणी करतेय शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 21:00 IST2019-03-19T21:00:00+5:302019-03-19T21:00:00+5:30
अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे.

श्रिया पिळगावकर ह्या ठिकाणी करतेय शूटिंग
अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या तिच्या 'मिर्झापूर' या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र सध्या ती पंजाबमध्ये चित्रीकरण करते असल्याचे श्रियाने सोशल मीडियावर सांगितले आहे.
श्रिया पिळगावकरने तिचा गुरूद्वारा बाहेरील फोटो शेअर करत लिहिले की, खूपच छान शुभारंभ. उद्यापासून पंजाबमध्ये चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. आणखीन माहिती लवकरच सांगेन.
श्रिया कोणत्या प्रोजेक्टचे चित्रीकरण करत आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. तिने शाहरूख खानसोबत 'फॅन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अनुभव सिन्हाचा आगामी चित्रपट 'अभी तो पार्टी शुरू हुई है' आणि गुरींदर चड्ढाचा ब्रिटीश पीरिएड ड्रामा 'बीचम हाऊस'मध्ये श्रिया पाहायला मिळणार आहे.
इतकेच नाही तर 'हाथी मेरे साथी' चित्रपटात कल्कीच्या जागी श्रियाची वर्णी लागली आहे. या चित्रपटातून ती दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रिया पिळगावकरने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, २०१९ वर्षाची सुरूवात खूप चांगली झाली असून मी हाथी मेरे साथी चित्रपटात राणा दुग्गाबतीसोबत दिसणार आहे. या चित्रपटात काम करायला मजा येणार आहे आणि या चित्रपटाचा विषय खूप चांगला आहे. माझ्यासाठी हा चित्रपट खूप खास असून पहिल्यांदाच मी त्रिभाषिक चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटातून तमीळ व तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करते आहे.