'मुलांना माझे चित्रपट पाहायला लाज वाटते...' ३ इडियट्स फेम अभिनेत्याने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 10:17 AM2023-07-11T10:17:38+5:302023-07-11T10:18:51+5:30
अभिनेता म्हणतो काय माहित कशी काय इतकी लाजाळू मुलं जन्माला आली
बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशी (Sharman Joshi) त्याच्या खास शैलीसाठी ओळखला जातो. '3 इडियट्स' मधील त्याची भूमिका चांगलीच गाजली. शर्मनने थिएटर केले आहे आणि नंतर तो सिनेमांकडे वळला. विनोदी भूमिका असो किंवा गंभीर शर्मनने नेहमीच आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. पण शर्मनचे चित्रपट बघायला त्याच्याच मुलांना लाज वाटत असल्याचा खुलासा त्याने नुकताच एका मुलाखतीत केला.
मुलांना माझे चित्रपट पाहायला लाज वाटते
शर्मन 2000 साली प्रेरणा चोप्रासोबत लग्नबंधनात अडकला. त्याला ख्याना, विहान आणि वर्यन ही तीन मुलं आहेत. शर्मन म्हणाला, 'माझी मुलं माझे चित्रपट बघतच नाहीत. त्यांना खूप लाज वाटते. काय माहित कशी काय इतकी लाजाळू मुलं झाली (हसतच). अगदीच पाहत नाही असंही नाही 'फरारी की सवारी','हेट स्टोरी 3' त्यांना आवडले.'
तो पुढे म्हणाला,'आजकाल मुलांच्या स्क्रीनटाईमवर लक्ष ठेवावं लागतं. प्रेरणा त्यांच्याकडे लक्ष देते. सोशल मीडियाच्या जमान्यात मुलं त्याचा किती वापर करत आहेत हे बघावं लागतं. पूर्ण दिवस सोशल मीडियावर राहाल तर नुकसान होतं. म्हणूनच मी माझ्या मुलांनाही आयुष्यात संतुलन राखायला शिकवतो.
३ इडियट्सचा सिक्वल येणार का?
जोपर्यंत राजू हिरानी यांच्याकडे सिक्वलसाठी चांगली कहाणी येत नाही तोवर काहीच सांगता येणार नाही. ते सिक्वलविषयी नक्कीच विचार करतात आणि बोलतात. एकदा त्यांनी मला स्क्रीप्ट ऐकवलीही होती. पण नंतर त्या स्टोरीबाबत पुढे काही झालं नाही. काम सुरु आहे राजू सरत्यावर मेहनत घेत आहेत.
शर्मन जोशी नुकताच 'कफस' वेबसिरीजमध्ये दिसला. यामध्ये त्याने राघव ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तर त्याच्यासोबत अभिनेत्री मोना सिंह आहे. शर्मन आणि मोनाने '3 इडियट्स' मध्ये एकत्र काम केले आहे.