Sharmila Tagore Birthday Special : शर्मिला टागोर यांनी त्या काळात केले होते बिकिनी शूट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 10:48 AM2018-12-08T10:48:37+5:302018-12-08T10:57:26+5:30
शर्मिला टागोर यांच्या अभिनयाची तारीफ आजही केली जाते. त्यांच्या सौंदर्यावर तर त्यांचे चाहते चांगलेच फिदा होते. शर्मिला टागोर यांनी त्या काळात बिकनी शूट करून त्या एक बोल्ड अभिनेत्री असल्याचे दाखवून दिले होते.
शर्मिला टागोर यांचा आज म्हणजेच 8 डिसेंबरला वाढदिवस असून त्यांचा जन्म कानपूरमध्ये झाला. त्या केवळ 13 वर्षांच्या असताना त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी बंगाली चित्रपटापासून त्यांच्या अभिनयप्रवासाला सुरुवात केली आणि काहीच वर्षांत बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना केली जाऊ लागली. त्यांनी आराधना, अमर प्रेम, सफर, डाग, आ गले लग जा, चुपके चुपके यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडमध्ये करियर जोरावर असतानाच त्यांनी प्रसिद्ध क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांच्यासोबत लग्न केले. त्यांना सैफ अली खान, सोहा अली खान, सबा अली खान अशी तीन मुले आहेत.
शर्मिला टागोर यांच्या अभिनयाची तारीफ आजही केली जाते. त्यांच्या सौंदर्यावर तर त्यांचे चाहते चांगलेच फिदा होते. शर्मिला टागोर यांनी त्या काळात बिकनी शूट करून त्या एक बोल्ड अभिनेत्री असल्याचे दाखवून दिले होते. आता बॉलिवूडमध्ये बिकिनी सीन्स देणे कॉमन बाब आहे. मात्र एक काळ असाही होता की, बिकिनी घालणे पाप समजले जायचे. प्रेक्षकच त्या अभिनेत्रीला चरित्रहीन घोषित करायचे. अशा काळात शर्मिला यांनी बिकिनी फोटो काढून इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली होती. मात्र यामुळे त्यांच्या सासूचा प्रचंड संताप झाला होता. जेव्हा त्यांनी शर्मिला यांचे बिकिनी फोटो बघितले तेव्हा त्या थेट शर्मिला यांना भेटायला गेल्या.
शर्मिला यांनी ‘फिल्मफेअर’साठी हे फोटोशूट केले होते. साप्ताहिकाच्या कव्हर पेजवर त्यांचा बिकिनी फोटो त्याकाळी झळकला होता. त्यावेळी शर्मिला यांचे लग्न मन्सूर अली खान पतौडी यांच्याबरोबर ठरले होते.
हा फोटो प्रकाशित झाल्यानंतर जेव्हा मन्सूर अली खान पतौडी यांच्या आईने शर्मिला यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती, तेव्हा शर्मिला प्रचंड घाबरल्या होत्या. त्यांना असा प्रश्न पडत होता की, त्यांच्या बिकिनी फोटोचा परिणाम लग्नावर तर होणार नाही ना? कारण शर्मिला मन्सूर अली खान पतौडी यांच्यावर जीवापाड प्रेम करीत होत्या. त्यांना संपूर्ण आयुष्य त्यांच्याबरोबरच व्यतित करायचे होते. या भीतीपोटी शर्मिला यांनी नंतर एका निर्मात्याशी चर्चा करून रातोरात शहरातील सर्व पोस्टर काढण्यास सांगितले होते.