'मुंज्या' ओटीटीवर आलाय! शर्वरी वाघचा हॉरर कॉमेडी सिनेमा कुठे पाहाल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 03:51 PM2024-08-26T15:51:54+5:302024-08-26T15:52:18+5:30

'मुंज्या' आता घरबसल्या बघायला मिळणार आहे. हो तुम्ही बरोबर वाचताय. 'मुंज्या' ओटीटीवर रिलीज झाला आहे.

Sharvari Wagh-Abhay Verma horror-comedy Film Munjya Release on Disney+ Hotstar | 'मुंज्या' ओटीटीवर आलाय! शर्वरी वाघचा हॉरर कॉमेडी सिनेमा कुठे पाहाल? जाणून घ्या

'मुंज्या' ओटीटीवर आलाय! शर्वरी वाघचा हॉरर कॉमेडी सिनेमा कुठे पाहाल? जाणून घ्या

Sharvari Wagh : आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' (Munjya) सिनेमा ७ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. हॉरर कॉमेडी असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत होते. चित्रपटगृहात बघायची संधी हुकलेल्या प्रेक्षकांसाठी आता हा सिनेमा ओटीटीवर दाखल झाला आहे. आता 'मुंज्या' सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. 

'मुंज्या' सिनेमाची कथा प्रेक्षकांना भावली होती.  थिएटरमध्ये बॉलिवूड सिनेमांना तगडी टक्कर दिल्यानंतर आता 'मुंज्या' सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. Disney+ Hotstar या ओटीटी चॅनेलवर 'मुंज्या' सिनेमा नुकताच रिलीज करण्यात आला. त्यामुळे आता घरबसल्या प्रेक्षकांना Disney+ Hotstar वर हा सिनेमा पाहता येणार आहे. 

सोशल मीडियावर Disney+ Hotstarने  पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल माहिती देताना Disney+ Hotstar ने पोस्टमध्ये लिहिलं, 'तुम्हाला  'मुंज्या'ची आठवण आली? तो त्याच्या मुन्नीला शोधायला निघाला आहे... त्यामुळे मुन्नीने सावध रहावे'.  'मुंज्या' हा महाराष्ट्रीय संस्कृतीतील एक प्रकारचं भूत आहे.  यात हॉरर कथानकासोबतच रोमान्सचा तडकाही पाहायला मिळतोय.


'स्त्री', 'रुही' आणि 'भेडिया' या सिनेमांनंतर मॅडॉक फिल्मच्या माध्यमातून हॉरर-कॉमेडी युनिव्हर्समधील  'मुंज्या' हा चौथा चित्रपट आहे. कॉमेडी एंटरटेनमेंटचं पॅकेज असलेला  'मुंज्या' सर्वांना आवडला. सिनेमाची कथा एकदम फ्रेश आहे. चित्रपटात शर्वरी, अभय वर्मा, मोना सिंग, सत्यराज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय सुहास जोशी, भाग्यश्री लिमये, अजय पूरकर हे मराठी कलाकारही झळकले आहेत.

Web Title: Sharvari Wagh-Abhay Verma horror-comedy Film Munjya Release on Disney+ Hotstar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.