शर्वरी वाघचं समुद्रकिनारी टायर फ्लिप वर्कआऊट, बघा फिटनेससाठी कशी घेतेय मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 14:28 IST2025-02-11T14:27:38+5:302025-02-11T14:28:26+5:30

अभिनेत्री शर्वरी वाघ तिच्या फिटनेसमुळे चर्चेत आली आहे.

Sharvari Wagh's Tire Flip Workout On The Beach Shares Photos Viral | शर्वरी वाघचं समुद्रकिनारी टायर फ्लिप वर्कआऊट, बघा फिटनेससाठी कशी घेतेय मेहनत

शर्वरी वाघचं समुद्रकिनारी टायर फ्लिप वर्कआऊट, बघा फिटनेससाठी कशी घेतेय मेहनत

Sharvari Wagh: मराठमोळ्या शर्वरी वाघला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. लोकप्रियतेच्या बाबतीत ती चांगलीच अग्रेसर आहे. सोशल मिडियावर तिचे फॅन फॉलोईंग जबरदस्त असून तिच्या पोस्ट नेहमीच व्हायरल होत असतात. शर्वरी तिच्या फिटनेसबाबतही अतिशय जागरूक आहे. शर्वरी नेहमीच तिच्या फिटनेस आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. शर्वरी फिटनेससाठी कठोर परिश्रम घेते. ती कधीही वर्कआऊट (Sharvari Wagh Workout) चुकवत नाही. आताही शर्वरीनं वर्कआऊटचे काही फोटो शेअर केले आहेत.

शर्वरी नेहमीच मंडे मोटिव्हेशनल पोस्टद्वारे चाहत्यांना फिटनेससाठी प्रेरित केलंय. काल तिने समुद्रकिनाऱ्यावर टायर फ्लिप करतानाचे फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "चांगल्या बीच वर्कआउटचा कधीच कंटाळा येत नाही". वाईआरएफ स्पाय युनिव्हर्सच्या 'अल्फा' या आगामी ॲक्शनपटाच्या पुढील शेड्यूलपूर्वी ती स्वतःला तयार करत असल्याचं दिसून येतंय. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांसाठी खूप प्रेरणादायी ठरत आहे. 


शर्वरीने हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत आपले स्थान पक्के केले आहे. 'मुंज्या' या १०० कोटींच्या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटाने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. त्याशिवाय 'महाराज' या ओटीटी ब्लॉकबस्टरने आणि ॲक्शन-थ्रिलर 'वेदा'मधील दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.  आता शर्वरीचा आगामी 'अल्फा' चित्रपट यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग आहे. 'अल्फा' चित्रपटामध्ये शर्वरी वाघ महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या सिनेमात ती अभिनेत्री आलिया भट हिच्यासोबत झळकणार आहे. आता शर्वरी वाघ आणि आलिया अल्फा सिनेमातून काय जादू करणार याची सर्वांना उत्सुकता आहे
 

Web Title: Sharvari Wagh's Tire Flip Workout On The Beach Shares Photos Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.