​आज दुपारी १२ वाजता शशी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार; करिना-सैफ, काजोल, अमिताभ यांनी घेतले अंत्यदर्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 04:37 AM2017-12-05T04:37:51+5:302017-12-05T10:07:51+5:30

बॉलिवूडचे चतुरस्त्र नेते शशी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूड शोकाकूल आहे. संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोक पसरला आहे. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच,  ...

Shashi Kapoor cremated here at 12 noon; Kareena-Saif, Kajol, Amitabh take anecdery! | ​आज दुपारी १२ वाजता शशी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार; करिना-सैफ, काजोल, अमिताभ यांनी घेतले अंत्यदर्शन!

​आज दुपारी १२ वाजता शशी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार; करिना-सैफ, काजोल, अमिताभ यांनी घेतले अंत्यदर्शन!

googlenewsNext
लिवूडचे चतुरस्त्र नेते शशी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूड शोकाकूल आहे. संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोक पसरला आहे. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच,  अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. कपूर घराण्याची लेक करिना कपूर, सैफ अली खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन,ऐश्वर्या राय, काजोल आदी सेलिब्रिटींनी शशी कपूर यांच्या निवासस्थानी जात त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. आज दुपारी १२ वाजता मुंबई्नच्या सांताक्रूज येथील स्मशानभूमीत शशी कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.   





भारताचे राष्ट्रपती  रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेते व बॉलिवूड दिग्गजांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले.





काल  ४ डिसेंबरला संध्याकाळी ५.२० ला मुंबईच्या एका रूग्णालयात  शशी कपूर यांनी अंतिम श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते किडणीच्या आजाराने आजारी होते. २०१४ मध्ये त्यांच्यावर बायपास सर्जरी झाली होती. त्यांच्या पश्चात करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही मुले आहेत. 

ALSO READ : जाणून घ्या कसा होता शशी कपूर यांचा अभिनयप्रवास

१९८४ मध्ये शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर यांचे कर्करोगाने निधन झाले होते. जेनिफर यांच्या निधनानंतर शशी कपूर एकाकी राहायला लागले होते. यानंतर ते सतत आजारी राहू लागले. आजारपणामुळे त्यांनी चित्रपटांपासून संन्यास घेतला. २०११ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. २०१५ मध्ये दादा साहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना गौरविले गेले. कपूर घराण्यातील हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे सदस्य होते. शशी कपूर यांनी सुमारे १६० चित्रपटांत काम केले. यात १४८ हिंदी व १२ इंग्रजी चित्रपटांचा समावेश आहे. १८ मार्च १९३८ रोजी जन्मलेल्या शशी कपूर यांनी ६० व ७० च्या दशकांत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिलेत. अवघे कपूर घराणे त्यांना ‘अंग्रेज कपूर’ नावाने बोलवायचे. कारण शशी कमालीचे शिस्तप्रीय होते. ते दिवसभरात १५ ते १८ तास शूटिंग करायचे. यामुळेच राज कपूर यांनी त्यांना ‘टॅक्सी कपूर’ हे नाव दिले होते.

Web Title: Shashi Kapoor cremated here at 12 noon; Kareena-Saif, Kajol, Amitabh take anecdery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.