शशी कपूर कडून बरेच काही शिकलो- सुभाष घई !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 03:19 PM2017-12-04T15:19:39+5:302017-12-04T20:49:39+5:30
शशी कपूर सर्वांना सोडून गेले, त्यामुळे दु:ख वाटत आहे. अतिशय शिस्तप्रिय, विनम्र अशा या अभिनेत्याकडून मला बरेच काही शिकायला ...
श ी कपूर सर्वांना सोडून गेले, त्यामुळे दु:ख वाटत आहे. अतिशय शिस्तप्रिय, विनम्र अशा या अभिनेत्याकडून मला बरेच काही शिकायला मिळाली अशी भावना दिग्दर्शक सुभाष घई यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, ‘मी ७० व्या दशकाच्या शेवटी ‘गौतम गोविंदा’ आणि ‘क्रोधी’ या दोन चित्रपटांमध्ये त्यांच्या सोबत काम केले आहे. त्यांच्याकडून मला कामाबद्दल निष्ठा, शिस्त, वेळेचे नियोजन, अनुकंपा, विनयशिलता आदी चांगले गुण शिकायला मिळाले. शिवाय या गुणांच्या आधारेच चित्रपट आणि थिएटरांचा विकास होण्यास मदत झाली. त्यांचे ह्रदय आणि मन खूपच सुंदर होते. अशा या अभिनेत्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच सदिच्छा.’
शशी कपूर यांनी हिंदी चित्रपटातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखविली होती. विशेष म्हणजे ते बॉलिवूड स्टार होते, ज्यांनी इंग्रजी चित्रपटात नायक म्हणून काम केले होते. त्यांची ओळख बॉलिवूडचे रोमॅँटिक स्टार म्हणून होती. बॉलिवूडच्या सुंदर आणि सुपरहिट नायिकांसोबत शशी कपूर यांनी बॉक्स आॅफिसवर मोठे यश मिळविले आहे.
वहिदा रहमान सोबत कभी कभी, त्रिशुल, नमक हलाल या चित्रपटात शशी कपूर यांनी काम केले होते तर आशा पारेख या प्यार का मौसम या चित्रपटात शशी यांच्या नायिका होत्या. झीनत तमान आणि शशी कपूर यांच्या जोडीचा सत्यम शिवम सुंदरम हा चित्रपट प्रचंड गाजला होता. जुनुन, फकिरा यांसारख्या चित्रपटात शशी कपूर आणि शबाना आझमी यांची जोडी जमली होती तर रेखा यांनी बसेरा, उत्सव यांसारख्या चित्रपटात त्यांच्यासोबत काम केले होते. दीवार या चित्रपटात नितू सिंग शशी कपूर यांच्यासोबत मुख्य भूमिकेत होत्या तर नफिसा अली यांनी जुनुन या शशी कपूर यांच्या चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिदीर्ला सुरुवात केली. सुप्रिया पाठक यांनी कलयुग, विजेता यांसारख्या चित्रपटात शशी कपूर यांच्यासोबत काम केले होते.