शत्रुघ्न सिन्हा आणि या अभिनेत्रीच्या प्रेमकथेची चांगलीच झाली होती चर्चा, त्यांची पत्नी पूनमला देखील होती या अफेअरची कल्पना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 10:58 AM2017-12-09T10:58:15+5:302017-12-09T16:28:15+5:30
शत्रुघ्न सिन्हा यांचा आज वाढदिवस असून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पारस, दोस्त, काला पत्थर, दोस्ताना यांसारख्या एकाहून एक हिट चित्रपटांमध्ये ...
श ्रुघ्न सिन्हा यांचा आज वाढदिवस असून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पारस, दोस्त, काला पत्थर, दोस्ताना यांसारख्या एकाहून एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा खामोश हा संवाद तर प्रचंड गाजला. आजही प्रेक्षक त्यांच्या या संवादाची आवर्जून आठवण काढतात. शत्रुघ्न सिन्हा गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात व्यग्र असल्याने चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. त्यांची अभिनयाची गादी सध्या त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा चालवत आहे. तिने तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून दबंग या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने खूपच कमी काळात बॉलिवूडमध्ये तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. सोनाक्षीला लव आणि कुश अशी दोन भावंडं आहेत.
Also Read : शत्रुघ्न सिन्हा भलतेच चुकले! शुभेच्छा एकाला, फोटो भलत्याचाच!!
शत्रुघ्न सिन्हा चित्रपटात काम करत असताना त्यांच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत राहिले. शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम यांचा प्रेमविवाह झाला होता. पूनम या पूर्व मिस इंडिया असून पूनम यांनी देखील काही चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. पाकिजा या चित्रपटातील आप के पाव जमीन पर मत रखिये हा संवाद एका कागदावर लिहून शत्रुघ्न यांनी पूनम यांना चालत्या ट्रेनमध्ये प्रपोज केले होते. पण पूनमशी लग्न केल्यानंतर देखील अनेक वर्षं रिना रॉय सोबत शत्रुघ्न सिन्हा यांचे अफेअर होते. या नात्याची कबुली शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेकवेळा दिली आहे. त्यांनी त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, रिना आणि त्यांचे अफेअर जवळजवळ सात वर्षं सुरू होते. पूनमला देखील या नात्याविषयी माहीत होते.
एवढेच नव्हे तर शत्रुघ्न सिन्हा यांच्या आत्मचरित्रात देखील रिना रॉय आणि त्यांच्या अफेअरचा उल्लेख करण्यात आला आहे. सोनाक्षीने चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर तिचे लूक्स हे रिना रॉय सारखे असल्याची मीडियात चर्चा रंगली होती. त्यावर इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षीने म्हटले होते की, माझा जन्म व्हायच्या आधी रिना रॉय माझ्या वडिलांच्या आयुष्यात होत्या. हा भूतकाळ असून मला यावर जास्त काहीही बोलायचे नाहीये. केवळ मी माझ्या आईसारखीच दिसते एवढीच एक गोष्ट मला सगळ्यांना सांगायची आहे.