शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पत्नी आणि मुलांसह 'रामायण' मध्ये परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 12:18 PM2024-07-03T12:18:49+5:302024-07-03T12:19:47+5:30
लेकीच्या लग्नानंतर पुढच्याच दिवशी त्यांना अॅडमिट करण्यात आले होते.
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughna Sinha) यांना काही दिवसांपूर्वी तब्येतीच्या अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लेक सोनाक्षीच्या लग्नानंतर त्यांना रुटीन चेकअपसाठी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका आठवड्यानंतर काल 2 जुलै त्यांना डिस्चार्ज मिळाला. गेल्याच आठवड्यात सोनाक्षी आणि जहीर इकबाल यांनी रजिस्टर मॅरेज केले. तेव्हा शत्रुघ्न सिन्हाही होते. लेकीच्या लग्नानंतर पुढच्याच दिवशी त्यांना अॅडमिट करण्यात आले होते.
माध्यम रिपोर्टनुसार, शत्रुघ्न सिन्हा यांना मंगळवारी रुग्णालयातून सुट्टी मिळाली. पत्नी पूनम आणि दोन्ही मुलं लव-कुश यांच्यासोबत ते जुहू येथील 'रामायण' निवासस्थानी पोहोचले. शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयातील स्पेशल रुममध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांच्य पत्नी पूनम सिन्हा पूर्णवेळ त्यांच्यासोबत होत्या. फिल्ममेकर पहलाज निहलानी यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती दिली. माझे मित्र रुग्णालयातून परत घरी आले आहेत म्हणून मी खूप खूश असल्याचं ते म्हणाले.
काही रिपोर्ट्सनुसार, शत्रुघ्न सिन्हा हे डायनिंग रुममध्येच घसरुन पडले होते ज्यामुळे त्यांना दुखापत झाली होती. प्रचंड वेदना झाल्याने त्यांच्यावर सर्जरी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र मुलगा लव सिन्हाने याचं खंडन केलं. व्हायरल फीवर आणि वीकनेसमुळे त्यांना अॅडमिट करण्यात आलं होतं असं सांगत त्याने सर्व चर्चांवर पूर्णविराम दिला.