लेकीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले, 'ती जहीरसोबत खूप जास्त...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 10:28 AM2024-06-24T10:28:28+5:302024-06-24T10:29:26+5:30

सोनाक्षी आणि जहीर यांच्या रजिस्टर मॅरेजवेळी शत्रुघ्न सिन्हा लेकीच्या बाजूलाच उभे होते.

Shatrughan Sinha s reaction after Sonakshi Jaheer s marriage says she is more happy with him | लेकीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले, 'ती जहीरसोबत खूप जास्त...'

लेकीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले, 'ती जहीरसोबत खूप जास्त...'

शत्रुघ्न सिन्हा (Shatrughna Sinha) यांची लाडकी लेक अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) काल लग्नबंधनात अडकली. बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत (Jaheer Iqbal) तिने रजिस्टर मॅरेज केले. यानंतर बॉलिवूडमधील मित्रपरिवारासाठी ग्रँड रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. रेखा, सलमान खान, काजोलसह अनेकांनी सोनाक्षी-जहीरला आशीर्वाद देण्यासाठी हजेरी लावली. दरम्यान लेकीत लग्नातशत्रुघ्न सिन्हा भावूक झालेले दिसले. लग्नानंतरची त्यांची प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे.

सोनाक्षी आणि जहीर यांच्या रजिस्टर मॅरेजवेळी शत्रुघ्न सिन्हा लेकीच्या बाजूलाच उभे होते. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान होतं. लग्नावरुन बापलेकीमध्ये सुरुवातीला थोडा तणाव होता. नंतर तो दूर झाला. शत्रुघ्न सिन्हा यांनी दोघांना आशीर्वाद दिला. लग्नानंतर माध्यमांशी बातचीत करताना ते म्हणाले, "प्रत्येक बाप या क्षणाची वाट पाहत असतो जेव्हा तो आपल्या लेकीचा हात तिने निवडलेल्या मुलाच्या हातात देतो. माझी मुलगी जहीरसोबतच सर्वात जास्त आनंदी आहे ही माझ्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. देव या जोडीसोबत कायम असू दे."

सोनाक्षी आणि जहीर यांनी रिसेप्शन पार्टीत बरीच धमाल केली. 'आफ्रीन आफ्रीन','छैय्या छैय्या','तेरे मस्त मस्त दो नैन' या गाण्यांवर त्यांनी ठेका धरला. त्याच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Web Title: Shatrughan Sinha s reaction after Sonakshi Jaheer s marriage says she is more happy with him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.