रिना रॉयच्या लग्नाची गोष्ट ऐकून हुमसून हुमसून रडले होते शत्रुघ्न सिन्हा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2018 08:39 AM2018-01-07T08:39:28+5:302018-01-07T14:09:28+5:30
‘नागीन’,‘कालीचरण’,‘आशा’,‘पापी’,‘जमानत’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटात दिसलेली अभिनेत्री रिना रॉय हिचा आज (७ जानेवारी) वाढदिवस. ८० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये ...
‘ ागीन’,‘कालीचरण’,‘आशा’,‘पापी’,‘जमानत’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटात दिसलेली अभिनेत्री रिना रॉय हिचा आज (७ जानेवारी) वाढदिवस. ८० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणारी रिना लवकरच छोट्या पडद्यावर वापसी करणार असल्याची खबर आहे. १९७२ साली ‘जरूरत’ या बी. आर इशारा यांच्या चित्रपटातून रिनाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आणि पुढे तिने अनेक हिट सिनेमे दिलेत.
तुम्हाला माहित नसेन पण रिना रॉयचे खरे नाव रुपा असून तिचा जन्म मुंबईत झाला होता. तिचे वडील मुस्लिम तर आई हिंदू होती. रिनाच्या आईवडिलांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला होता. आई आणि बहिण-भावांच्या उदरनिवार्हासाठीरिनाने फार कमी वयात आपले फिल्मी करिअर सुरु केले होते.
गेल्या १६ वर्षांपासून अभिनयापासून दूर असलेल्या रिनाच्या सिनेमांपेक्षाही तिच्या अफेअरचे किस्सेच अधिक गाजलेत. रिनाला ‘कालीचरण’द्वारे खरी ओळख मिळाली आणि पुढे याच चित्रपटाच्या को-स्टारसोबत रिनाच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. हा को-स्टार होता शत्रुघ्न सिन्हा. रिना व शत्रुघ्न यांच्या अफेअरच्या कहाण्या अनेक दशकांपासून मीडियात येत आहेत. पण शत्रुघ्न यांचे चरित्र लिहिणा-या भारती एस प्रधानने रिनाचे मित्र आणि निर्माता पहलाज निहलानी यांच्या हवाल्याने या प्रेमकथेबद्दल एक मार्मिक खुलासा केला होता.
१९८० मध्ये शत्रुघ्न यांनी पूनम सिन्हाशी लग्न केले. पण लग्नानंतरही शत्रूघ्न रिनाला विसरू शकले नाही. लग्नानंतरही हे संबंध कायम होते. शत्रुघ्न आपल्याशी लग्न करेल, असे रिनाला तेव्हाही वाटत होते. पण हळूहळू तिच्या या विश्वासाला तडा जात गेला आणि तसा दोघांच्या नात्यालाही तडा गेला. शत्रुघ्नवरिनायादोघांमध्ये असा तणाव सुरु असतानाच पहलाज निहलानींच्या ‘हथकडी’ या चित्रपटातहे दोघे एकत्र काम करत होते. यादरम्यान रिना व शत्रुघ्न यांचे वाद इतके विकोपाला जात की, निहलानींना ते निस्तरता निस्तरता नाकी नऊ येई. खरे तर निहलानींना त्यांच्या पुढच्या चित्रपटातही हीच जोडी घ्यायची होती. पण रिनाने शत्रुघ्नसोबत काम करण्यास स्पष्ट नकार दिला. तुझ्या मित्राने मला उत्तर द्यावे, तरच मी त्याच्यासोबत पुढच्या चित्रपटात काम करले. तो माझ्यासोबत लग्न करणार नसेल तर मी आठ दिवसांत दुसºया कुणाशी लग्न करेल, असा निरोप रिनाने निहलानींकडे दिला.
निहलानी हा निरोप घेऊन शत्रुघ्कडे गेलेत. यानंतर शत्रुघ्नने निहलानींना फोन केला आणि फोनवर तो अगदी लहान मुलासारखा रडला. निहलानींनी प्रथमच त्याला असे रडताना बघितले. निहलानींच्या तोंडचा हा सगळा किस्सा भारती यांनीआपल्या पुस्तकात लिहिला आहे. निहलानींनी त्यावेळी पहिल्यांना शत्रुघ्न यांना सल्ला दिला होता. तिला थांबवू नकोस, जावू दे, असे ते त्यांनी शत्रुघ्नला म्हटले होते.