कॅनडाच्या रस्त्यांवर शहनाज गिलने केला जबरदस्त डान्स,तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 19:58 IST2021-03-26T19:56:19+5:302021-03-26T19:58:08+5:30
Shehnaaz Gill dance: कॅनडाच्या रस्त्यावर डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा डान्स व्हिडीओ पाहून चाहतेही लाईक्स आणि कमेंट्स देत पसंती देत आहेत.

कॅनडाच्या रस्त्यांवर शहनाज गिलने केला जबरदस्त डान्स,तुम्ही पाहिला का?
शहनाज गिल सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते आणि आपल्या चाहत्यांसाठी कॉमेडी व्हिडिओसह हॉट फोटो शेअर करत असते. बिग बॉसनंतर शहनाजने असा काही मेकओव्हर केला की, सारेच पाहत राहिले. पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी शहनाज सध्या तिच्या आगामी सिनमाचे कॅनडामध्ये शूटिंग करत आहे. शूटिंगमधून ब्रेक मिळताच शहनजा कॅनडाच्या रस्त्यावर डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा डान्स व्हिडीओ पाहून चाहतेही लाईक्स आणि कमेंट्स देत पसंती देत आहेत.
व्हिडीओबरोबरच शहनाज गिलनेही ग्लॅमरस अवतारात काही फोटो शेअर केली आहेत. तिने कारमध्ये बसून काही पोझेस देतानचे फोटोत पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोंना 6 लाखांहून अधिक लोकांनी पसंती दिली आहे. दिलजित दोसांझ आणि सोनम बाजवा यांच्या आगामी ‘हौसला रख’ या सिनेमात शहनजा झळकणार आहे. हा सिनेमा 14 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित होईल. अमरजीत सिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून दिलजित दोसांझने या सिनेमाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे.
सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच कलाकार सिनेमाचे हटके प्रमोशन करताना दिसले. काही दिवसांपूर्वीच शेहनाजने तिचा फोटो शेअर करत चाहत्यांना मोठा आश्चर्याचा धक्काच दिला होता. या फोटोत तिने बेबी बंम्प फ्लॉन्ट केल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी तिच्याबरोबर सिद्धार्थ शुक्ला नाही तर दिलजीत दोसांझ दिसत होता.
हा फोटो पाहून चाहते संभ्रमात पडले होते. त्यानंतर सा-यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रमोशनल पब्लिसिटी स्टंट असल्याचे स्पष्ट केले होते. काही दिवसांपूर्वी सिनेमाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले होते. सध्या सिनेमाची होणारी पब्लिसिटी पाहाता चाहत्यांमध्येही सिनेमासाठी उत्सुकता निर्माण झाल्याचे चित्र आहे.