Shehnaz Gill Emotional : 'लोकं आपल्याला सतत...'आणि शहनाज गिल आयुष्मानसमोर रडली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 10:57 AM2022-12-02T10:57:48+5:302022-12-02T10:59:20+5:30
पंजाबची कॅटरिना कैफ शहनाझ गिल नेहमी तिच्या नॅचरल अंदाजात असते.
Shehnaz Gill Emotional : पंजाबची कॅटरिना कैफ शहनाझ गिल नेहमी तिच्या नॅचरल अंदाजात असते. देसी वाईब्स विथ शहमाझ गिल या तिच्या (Desi vibes with Shehnaaz Gill Chat Show) चॅट शो मधून ती सध्या सेलिब्रिटींच्या मुलाखती घेताना दिसते. सेलिब्रिटींसोबत मजा मस्ती सुरु असते. पण नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये शहनाझ खुपच भावुक झाली आणि तिला रडू कोसळले.
अभिनेता आयुष्मान खुराना चा आगामी सिनेमा 'एन एक्शन हिरो' च्या प्रमोशनसाठी त्याने शहनाझच्या शो मध्ये हजेरी लावली. यावेळी आयुष्मानशी चॅट करताना शहनाझ भावुक झाली.
आणि शहनाझ ला रडू कोसळले
'प्रत्येकाच्याच आयुष्यात अनेक भावुक क्षण येतात. मीही अशा क्षणांमधून गेली आहे,' असे शहनाझ म्हणाली. यावेळी तिला नक्कीच सिद्धार्थ ची आठवण आली असणार म्हणून तिला रडू कोसळले. यानंतर आयुष्मानने तिला धीर दिला.
Shehnaaz 🥺🫂 you are the strongest loosing the person u love the most who u considered everything is shattering and the pain u went through i can't even imagine don't worry abt these internet trolls you are the best ♥️ sid is proud of u @ishehnaaz_gill#ShehnaazGill#SidNaazpic.twitter.com/UAzBwsWIqj
— SHEHNAAZ CANADIAN FC|(Fan Boy) (@shehnaazian18) December 1, 2022
आयुष्मान म्हणाला, 'सेलिब्रिटीज ना आपल्या भावना लपवणे शक्य नसते. कारण आपण नेहमी मीडियासमोर असतो. जर कोणी आपल्या भावना खुलेपणाने मांडत असेल तर सेलिब्रिटींनीही का नाही मांडावे. कोण काय म्हणेल याची चिंता का करायची. '
शहनाझ म्हणाली, तुम्हाला खरे सांगू, भावुक झाल्यावर लोक म्हणतात अरे ही तर सांत्वनासाठी हे करत आहे. हे सांगताना शहनाझ ला रडू आले. शहनाझ आजही सिद्धार्थच्या आठवणीत किती भावुक होते हे आपण बघितले आहे. सर्व चाहते सुद्धा सिद्धार्थची आठवण काढल्याशिवाय राहत नाहीत.