Shekhar Suman : “ते चारजण सापापेक्षा विषारी...”, प्रियंका पाठोपाठ शेखर सुमन यांनी सांगितली आपबीती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 05:10 PM2023-03-31T17:10:41+5:302023-03-31T17:28:45+5:30
Shekhar Suman : शेखर सुमन यांनी काही धक्कादायक आरोप केले आहेत. मला आणि माझ्या मुलाला बॉलिवूडमधील त्या चार व्यक्तींनी प्रचंड त्रास दिल्याचा आरोप शेखर सुमन यांनी केला आहे.
बॉलिवूडने मला कॉर्नर केलं, माझ्याविरोधात राजकारण केलं, म्हणून मी बॉलिवूड सोडून हॉलिवूडला गेले होते, असं प्रियंका चोप्रा अलीकडे एका मुलाखतीत म्हणाली होती. प्रियंकाच्या या मुलाखतीनंतर कंगना राणौत (KanganaRanaut) तिच्या बाजूने मैदानात उतरली होती. शिवाय करण जोहरनेच (Karan Johar) प्रियंकाला बॅन केलं होतं. करण जोहरमुळेच पीसी बॉलिवूड सोडून हॉलिवूडला गेली, असा दावा कंगनाने केला होता. प्रियंकानंतर आता अभिनेते शेखर सुमन (Shekhar Suman) यांनी असेच काही धक्कादायक आरोप केले आहेत. मला आणि माझ्या मुलाला बॉलिवूडमधील त्या चार व्यक्तींनी प्रचंड त्रास दिल्याचा आरोप शेखर सुमन यांनी केला आहे.
काय म्हणाले शेखर सुमन?
'मी इंडस्ट्रीमधील कमीत कमी अशा चार जणांना ओळखतो की, त्यांनी मला आणि माझा मुलगा अध्ययनला अनेक सिनेमांतून प्रोजेक्टमधून बाहेर काढण्यासाठी गँग केली होती. मी त्यांना चांगलाच ओळखून आहे. इंडस्ट्रीत या गँगस्टारचा मोठा दबदबा आहे. ते चौघे विषारी सापापेक्षा अधिक विषारी आहेत. अर्थात ते आमच्या मार्गात अडचणी निर्माण करू शकतात परंतु आम्हाला अडवू शकत नाहीत,'अशा आशयाचं ट्विट शेखर यांनी केलं आहे.
I know of atleast 4ppl in the industry who have ganged up to have me n adhyayan removed from many projects.i know it for sure.These 'gangsters' have a lot of clout and they are more dangerous than a rattle snake.But the truth is they can create hurdles but they cannot stop us.
— Shekhar Suman (@shekharsuman7) March 30, 2023
It will happen to others too.That's the way the cookie crumbles in the industry.Take it or leave it.and Priyanka decided to leave.and thank God she did.for now we have a true-blue global icon representing India in https://t.co/cleRR7DGsL they say every cloud has a silver lining.
— Shekhar Suman (@shekharsuman7) March 30, 2023
'ती चार माणसं नेहमीच इतरांना गोत्यात आणण्याचे काम करतात. ही चार माणसं कोण, हे सगळ्यांना ठाऊक आहे. एकतर तुम्हाला ही इंडस्ट्री सोडावी लागते किंवा या लोकांसोबत लढावं लागतं. प्रियंकाने इंडस्ट्री सोडण्याचा मार्ग निवडला आणि बरं झालं, तिच्या रूपात देशाला एक ग्लोबल स्टार मिळाली,' असंही अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे.
शेखर सुमन यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्यांना पाठींबा दिला आहे. अनेकांनी शेखर सुमन व त्यांचा मुलगा अध्ययन यांना हे सगळं सोसावं लागलं, याबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.