​फेसबुक अकाऊंटमुळे शेखर सुमनला सहन करावा लागला प्रचंड मन:स्ताप! वाचा काय आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2018 08:25 AM2018-04-08T08:25:49+5:302018-04-08T13:55:49+5:30

बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन याचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे उघडकीस आले आहे. अलीकडे शेखरच्या फेसबुक अकाऊंटवर अश्लिल फोटो पोस्ट ...

Shekhar Suman has suffered due to the Facebook account. Read what is the reason !! | ​फेसबुक अकाऊंटमुळे शेखर सुमनला सहन करावा लागला प्रचंड मन:स्ताप! वाचा काय आहे कारण!!

​फेसबुक अकाऊंटमुळे शेखर सुमनला सहन करावा लागला प्रचंड मन:स्ताप! वाचा काय आहे कारण!!

googlenewsNext
लिवूड अभिनेता शेखर सुमन याचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे उघडकीस आले आहे. अलीकडे शेखरच्या फेसबुक अकाऊंटवर अश्लिल फोटो पोस्ट करण्यात आले. शेखरला त्याच्या मित्रांकडून ही माहिती मिळाली. शेखरने लगेच सायबर सेलमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली. या हॅक प्रकरणात शेखर सुमनला प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला आणि यानंतर हे अकाऊंटचं बंद करण्याच्या विचारापर्यंत तो पोहोचला आहे.
ताज्या मुलाखतीत त्याने हा विचार बोलून दाखवला. मी सोशल मीडियावर फार अ‍ॅक्टिव्ह नाही. माझे अकाऊंट हॅक झाले हे मला ठाऊकही नव्हते. मित्रांकडून मला ही माहिती मिळाली. खरे तर मी फार पूर्वीच हे अकाऊंट बंद करणार होतो. पण जवळच्या लोकांनी मला असे करण्यापासून परावृत्त केले. चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचे हे आजचे सर्वाधिक प्रभावित माध्यम असल्याचे त्यांनी माझ्या गळी उतरवले. पण अकाऊंट हॅक झाल्यानंतर मला आता सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात राहण्यात कुठलाही रस राहिलेला नाही. फेसबुक अकाऊंट हॅक झाल्यावर मला प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. सेलिब्रिटींवर लोकांचा विश्वास आहे. माझ्या अकाऊंटवर अश्लिल फोटो दिसत असतील तर ते मीच पोस्ट केले, असा लोकांना समज होणे साहजिक आहे. अशास्थितीत मी दोषी नाही, हे मी कसे सिद्ध करू. शेवटी हा माझ्या प्रतिष्ठेचा विषय आहे. सोशल अकाऊंट बंद करण्याच्या निर्णयापर्यंत मी आलो आहे. डिजिटल युगात हे हॅकिंग प्रकरण अतिशय धोकादायक आहे, असे शेखर सुमन म्हणाला.

ALSO READ : ५४ वर्षीय शेखर सुमनने केले ट्रान्सफॉर्मेशन; बनविले सिक्स पॅक अ‍ॅब्स!

अगदी अलीकडे ‘भूमी’ या चित्रपटात   शेखर सुमन दिसला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा करिश्मा दाखवू शकला नाही, परंतु त्याची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. शेखरने १९८४ मध्ये आलेल्या ‘उत्सव’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत रेखा आणि शशी कपूर मुख्य भूमिकेत होते.  यानंतर नाचे मयूरी, अनुभव, संसार, त्रिदेव, प्रोफेसर की पडोसन, चोर मचाए शोर, चलो मुवी आदी चित्रपटांमध्ये त्याने काम केले. मात्र अशातही तो इंडस्ट्रीत म्हणावी तशी ओळख निर्माण करू शकला नाही.  मुलगा अध्ययनकरिता त्याने ‘हार्टलेस’या चित्रपटाचे दिग्दर्शन केले, परंतु हा चित्रपटही सुपरफ्लॉप ठरला. 

Web Title: Shekhar Suman has suffered due to the Facebook account. Read what is the reason !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.