कंगना राणौतविरुद्धच्या ट्विटने शेखर सुमन अडचणीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2017 12:28 PM2017-02-28T12:28:14+5:302017-02-28T17:58:14+5:30

एका अभिनेत्रीविरुद्ध ‘कोकेन अ‍ॅक्ट्रेस’ म्हणणे शेखर सुमनला महागात पडले. ट्विटरवर हे वाक्य कंगना राणौतविरुद्ध आहे असे समजून अनेकांनी शेखर ...

Shekhar Suman tweeted against Kangana Ranaut | कंगना राणौतविरुद्धच्या ट्विटने शेखर सुमन अडचणीत!

कंगना राणौतविरुद्धच्या ट्विटने शेखर सुमन अडचणीत!

googlenewsNext
ा अभिनेत्रीविरुद्ध ‘कोकेन अ‍ॅक्ट्रेस’ म्हणणे शेखर सुमनला महागात पडले. ट्विटरवर हे वाक्य कंगना राणौतविरुद्ध आहे असे समजून अनेकांनी शेखर सुमनची खिल्ली उडविली.
शेखर सुमन यांच्या अनुसार ते दुसºया व्यक्तीची गोष्ट करीत होते. सुमन यांनी दुसºया अकाऊंटवरून ट्विट केले होते. ‘एका कोकेन घेणाºया अभिनेत्रीने नसलेल्या स्टारडमचे ओझे खांद्यावर घेतले आहे. ती आता तोंडावर आपटली आहे, हा कसला न्याय आहे’ अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते. त्यांनी जरी अभिनेत्रीचे नाव घेतलेले नसले तरी ट्विटरवरील अनेकांच्या लक्षात आले की, हे कंगना राणौतसंदर्भातीलच ट्विट आहे. 

कंगना राणौतच्या समर्थनार्थ आलेल्या लोकांना शेखर यांनी ‘पेड ट्विटर’ म्हटले आहे. ‘कोणत्याही कारणास्तव एका कलाकाराच्या समर्थनार्थ आलेल्या चमचांमुळे आणि पैसे दिलेल्या समर्थकांमुळे मला भीती वाटत आहे’, असे शेखर यांनी म्हटले.

काही दिवसांपूर्वी कंगना राणौतने एका मुलाखतीत आपल्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडविषयी सांगितले होते की ती अशांना पूर्णत: विसरून गेली आहे.’ शेखर सुमन यांचा पुत्र अध्ययन सुमन हा कंगना राणौत हिचा माजी बॉयफ्रेंड आहे. हृतिक रोशनसोबतच्या विवादानंतर अध्ययन सुमन याने कंगना ड्रग घेणारी असल्याचे सांगून आपल्या संबंधादरम्यान शिवीगाळ आणि गैरवर्तणूक केल्याचे म्हटले होते.

शेखर सुमन यांच्या या ट्विटने हा विवाद पुन्हा उफाळून आला आहे. या ट्विटनंतर अनेकांनी ट्रोल करीत सुमन यांना खरीखोटी सुनावली. त्यानंतर त्यांनी आपले ट्विट दुसºयासाठी होते, असाही खुलासा केला.
कंगना राणौत हिचा रंगून हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट पहिल्या काही दिवसात फारशी कमाई करू शकला नाही. अर्थात तिच्या या कामाचे सर्वांनी कौतुक केले आहे.


 

Web Title: Shekhar Suman tweeted against Kangana Ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.