‘इश्क विश्क’ची अभिनेत्री कुणालाच ओळखेना! ‘या’ भयंकर आजाराचं झालं निदान!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 10:46 AM2022-06-29T10:46:14+5:302022-06-29T11:08:37+5:30

Shenaz Treasury: शाहिद कपूरचा ‘इश्क विश्क’ हा रोमॅन्टिक सिनेमा आठवत असेल तर या चित्रपटातून डेब्यू करणारी अभिनेत्री शहनाज ट्रेजरीवाला सुद्धा तुम्हाला नक्की आठवत असणार. सध्या याच शहनाजबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आलीये.

Shenaz Treasury Diagnosed With Prosopagnosia Called Face Blindness Ishq Vishk Actress | ‘इश्क विश्क’ची अभिनेत्री कुणालाच ओळखेना! ‘या’ भयंकर आजाराचं झालं निदान!!

‘इश्क विश्क’ची अभिनेत्री कुणालाच ओळखेना! ‘या’ भयंकर आजाराचं झालं निदान!!

googlenewsNext

शाहिद कपूरचा ‘इश्क विश्क’ (Ishq Vishk) हा रोमॅन्टिक सिनेमा आठवत असेल तर या चित्रपटातून डेब्यू करणारी अभिनेत्री शहनाज ट्रेजरीवाला (Shenaz Treasury) सुद्धा तुम्हाला नक्की आठवत असणार. शहनाजच्या क्युटनेसवर चाहते फिदा होते. या चित्रपटानंतर शहनाज फार मोजक्या सिनेमात दिसली. सध्या याच शहनाज ट्रेजरीवालाबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आलीये. होय, खुद्द तिने सोशल मीडियाद्वारे हा खुलासा केला आहे. शहनाजला प्रोसोपेग्नोसिया (Prosopagnosia) नावाचा आजार झाला आहे. अलीकडे तिच्या या आजाराचं निदान झालं.

या आजारामुळे ती लोकांचे चेहरे ओळखू शकत नाही. अगदी जवळच्या लोकांचे चेहरेही ती ओळखू शकत नाही. या आजाराला फेस ब्लाइंडनेस असंही म्हणतात.  
शहनाजने तिच्या इन्स्टास्टोरीवर या आजाराबद्दलचा खुलासा केला आहे. तिने लिहिले, ‘मला प्रोसोपेग्नोसिया नावाच्या आजार असल्याचं निदान झालं आहे.  मी सर्व लोकांचे चेहरे एकत्र लक्षात का ठेऊ शकत नाही, हे आत्ता मला कळलं. याला फेस ब्लाइंडनेसही म्हणतात. याचा अर्थ तुम्ही लोकांचे चेहरे ओळखू शकत नाही. मी लोकांचे चेहरे लक्षात ठेऊ शकत नव्हते. त्यामुळे अनेकदा मला लाजीरवाणं वाटत असे. मी फक्त लोकांच्या आवाजावरून त्यांना ओळखू शकते.’

जवळच्या मित्रांना, कुटुंबीयही अनोळखी
या आजाराच्या लक्षणांबद्दलही शहनाजने सांगितलं. हा आजार झालेली व्यक्ती अगदी जवळच्या मित्रांचे, कुटुंबीयांचे चेहरेही ओळखू शकत नाही.   माझ्यासोबत हे नेहमीच घडत होतं. मी माझ्या खास मित्रांनाही ओळखू शकतं नाही. जणू मी कित्येक दिवसांपासून त्यांना भेटलेली नाही. टीव्ही व चित्रपटाची कलाकार सगळेच एकसारखे दिसतात. त्यांना मी ओळखू शकत नाही. हा एक रिअल ब्रेन प्रॉब्लम आहे. प्लीज, दयाळू बना आणि हे समजून घ्या, असं तिने म्हटलं आहे.

शहनाज कॉलेजमध्ये असताना एका फोटोग्राफरची नजर तिच्यावर गेली आणि त्याने तिला मॉडेलिंगबद्दल विचारणा केली. इथून तिचा मॉडेलिंगचा प्रवास सुरू झाला. यानंतर ती अनेक जाहिरातींमध्येही झळकली. 2001 साली साऊथ चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर डेब्यू केला. 2003 मध्ये ‘इश्क विश्क’ चित्रपटातून तिने बॉनिवूडमध्ये एन्ट्री घेतली. अ‍ॅक्टिंगशिवाय शहनाजला ट्रॅव्हलिंगची आवड होती. तिने त्यालाच प्रोफेशनमधून निवडलं. आता ती मोठी ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून ओळखली जाते.

Web Title: Shenaz Treasury Diagnosed With Prosopagnosia Called Face Blindness Ishq Vishk Actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.