“राजकारण्याच्या मुलाबरोबर मी रिलेशनशिपमध्ये होते”, शर्लिन चोप्राचा खुलासा, म्हणाली, “तो सेक्ससाठी...”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 11:00 AM2023-07-24T11:00:40+5:302023-07-24T11:12:13+5:30
"मी पैशांसाठी अनेकांबरोबर झोपले...", शर्लिन चोप्राचा धक्कादायक खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शर्लिनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. पैशासाठी अनेकांबरोबर रात्र घालवल्याचा धक्कादायक खुलासा शर्लिनने मुलाखतीत केला आहे. याबरोबरच प्रसिद्ध राजकारण्याच्या मुलाला डेट केल्याचंही शर्लिनने सांगितलं आहे.
शर्लिनने सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने बॉलिवूड इंडस्ट्री, करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. “मी भूतकाळात अनेकांबरोबर पैशांसाठी झोपले आहे”, असं वक्तव्य शर्लिनने केलं होतं. यावरुन तिला मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ती म्हणाली, “हो, पण आता मी या गोष्टी करत नाही.” भूतकाळातील रिलेशनशिपबद्दल बोलताना हे वक्तव्य केल्याचा खुलासाही शर्लिनने केला. शर्लिनचे मोठ्या नेत्याच्या मुलाबरोबर प्रेमसंबंध होते, असं तिने या मुलाखतीत सांगितलं. पण, हे सगळं केवळ सेक्ससाठी सुरू होतं, असंही तिने सांगितलं.
"तुझी 'ब्रेस्ट साइज' काय? मी हात लावू शकतो का? असं दिग्दर्शकाने मला विचारलं अन् मी..."
एक्स बॉयफ्रेंड अजूनही तिच्याच शहरात राहत असल्याचा आणि वडिलांप्रमाणेच तोदेखील आता मोठा नेता झाल्याचा खुलासाही शर्लिनने केला. “जेव्हा केव्हा मी प्रेमाचा विचार करते. तेव्हा मला एक्स बॉयफ्रेंडबरोबर घालवलेले ते दिवस आठवतात. फक्त शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तो मला महागडे गिफ्ट द्यायचा, याची मला जाणीव झाली,” असंही शर्लिनेन सांगितलं. शर्लिनच्या या वक्तव्यांमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. शर्लिनने अनेक बॉलिवूड चित्रपटांत काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी राखी सावंतबरोबरच्या वादामुळे शर्लिन चर्चेत आली होती.