राज कुंद्रानंतर शिल्पा शेट्टीलाही अटक होणार? कोट्यवधींच्या फसवणुकीचे 'हे' प्रकरण भोवणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 05:33 PM2021-08-09T17:33:10+5:302021-08-09T17:35:41+5:30
पोर्नोग्राफीप्रकरणात पतीला अटक झाल्याने शिल्पा शेट्टी आधीच वादाच्या भोव-यात सापडली आहे. आता आणखी एका प्रकरणामुळे तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra)आधीच तुरूंगात आहे. पोर्नोग्राफीप्रकरणात पतीला अटक झाल्याने शिल्पा शेट्टी आधीच वादाच्या भोव-यात सापडली आहे. आता आणखी एका प्रकरणामुळे तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिल्पा आणि तिची आई सुनंदा शेट्टी (Sunanda Shetty) या दोघींवर कथितरित्या आर्थिक फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. स्लिमिंग स्किन सलून व स्पा सुरू करण्याच्या नावाखाली या मायलेकींनी लखनौतील व्यवसायिकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा आरोप आहे. याप्रकरणी लखनौतील हसरतगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, लखनौ पोलिसांची एक टीम याप्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई दाखल झालीये.
काय आहे प्रकरण
अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार शिल्पाने आयोसिस नावाची स्लिमिंग स्किन सलून व स्पा अशी एक कंपनी सुरू केली होती. शिल्पा या कंपनीची चेअरमन आहे तर तिची आई कंपनीची डायरेक्टर. या कंपनीवर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या कंपनीची एक ब्रांच लखनऊमध्ये देखील ती सुरू करणार होती. फ्रेंचाइजी देण्याच्या नावावर शिल्पा व तिच्या आईने कोट्यवधी रूपये घेतले. पण फ्रेंचाइजी दिली नाही. व्यवसायिक ज्योत्सना चौहान आणि रोहित वीर सिंह यांनी शिल्पाविरोधात आर्थिक फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे.
शिल्पा त्यांना हे स्पा सुरू करण्यासाठी जागा आणि इतरत्र साहित्य पुरवणार होती. परंतु दोनदा सुमारे अडीच कोटी रूपये वसूल केल्यानंतरही कुठलाच प्रतिसाद दिला नाही. महिनाभरापूर्वी लखनौ पोलिसांनी याप्रकरणी सुनंदा यांना नोटीस पाठवले होते. मात्र त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी आता पुन्हा एकदा तिच्याविरोधात नोटीस जारी करण्यात आली असून लखनौ पोलिसांची एक टीम मुंबईला पोहोचली आहे.