21 वर्षानंतर पुन्हा दिसली अंजली-देव यांची जबरदस्त केमिस्ट्री; रिक्रिएट केलं 'धडकन'मधलं गाणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 13:06 IST2023-12-11T13:05:27+5:302023-12-11T13:06:00+5:30
Dhadkan movie song: शिल्पा आणि सुनील यांनी रिक्रिएट केलेलं गाणं पाहून या सिनेमाला २१ वर्ष झाली असतील असं अजिबात वाटत नाही.

21 वर्षानंतर पुन्हा दिसली अंजली-देव यांची जबरदस्त केमिस्ट्री; रिक्रिएट केलं 'धडकन'मधलं गाणं
बॉलिवूडच्या इतिहासात आजवर असंख्य सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले आहेत. मात्र, काही सिनेमा असे आहेत जे रिलीज होऊन बराच काळ लोटला परंतु, त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे धडकन. शिल्पा शेट्टी (Shilpa shetty), अक्षय कुमार (akshay kumar) आणि सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा चांगलाच गाजला. आजही या सिनेमातील डायलॉग्स आणि गाणी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे या सिनेमातलं एक गाजलेलं गाणं तब्बल २१ वर्षानंतर शिल्पा आणि सुनील शेट्टी यांनी रिक्रिएट केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर शिल्पा आणि सुनील यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे 'धडकन' सिनेमा रिलीज झाल्यानंतर तब्बल २१ वर्षानंतर अंजली आणि देव एकमेकांच्या समोरासमोर आले. इतकंच नाही तर त्यांनी 'दिल ने ये कहाँ हैं दिलसे' या गाजलेल्या गाण्यावर पुन्हा एकदा डान्स केला. त्यामुळे त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, शिल्पा आणि सुनील यांनी रिक्रिएट केलेलं गाणं पाहून या सिनेमाला २१ वर्ष झाली असतील असं अजिबात वाटत नाही. आजही या दोन्ही कलाकारांनी २१ वर्षांपूर्वी गाण्यात जे एक्स्प्रेशन्स दिले होते अगदी तेच सेम एक्स्प्रेशन्स दिले. त्यामुळे त्यांचा व्हिडीओ लोकप्रिय ठरत आहे.