न्यू इअर सेलिब्रेशनसाठी शिल्पा शेट्टी फॅमिलीसह पोहोचली दुबईला, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 12:40 PM2017-12-31T12:40:19+5:302017-12-31T18:10:19+5:30

सध्या बॉलिवूडमधील बरेचसे सेलिब्रिटी न्यू इअर सेलिब्रेशनच्या मुडमध्ये असून, त्यासाठी त्यांनी विदेश गाठले आहे. श्रीलंका, बाली, केपटाउन, दुबई अशा ...

Shilpa Shetty arrives in Dubai for New Year Celebration, see photo! | न्यू इअर सेलिब्रेशनसाठी शिल्पा शेट्टी फॅमिलीसह पोहोचली दुबईला, पाहा फोटो!

न्यू इअर सेलिब्रेशनसाठी शिल्पा शेट्टी फॅमिलीसह पोहोचली दुबईला, पाहा फोटो!

googlenewsNext
्या बॉलिवूडमधील बरेचसे सेलिब्रिटी न्यू इअर सेलिब्रेशनच्या मुडमध्ये असून, त्यासाठी त्यांनी विदेश गाठले आहे. श्रीलंका, बाली, केपटाउन, दुबई अशा विविध भागात सेलिब्रिटी आपल्या परिवारासोबत पोहोचले आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा हीदेखील पती राज कुंद्रा आणि मुलगा विआनसोबत दुबईला पोहोचली आहे. याठिकाणी शिल्पा सध्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असून, आपल्या परिवारासोबत न्यू इअर सेलिब्रेशन करीत आहे. शिल्पाने तिच्या या व्हेकेशनचे काही फोटोज् शेअर केले असून, त्यात ती आपल्या परिवारासोबत एन्जॉय करताना दिसत आहे. 





शिल्पा आणि तिच्या परिवाराचे काही फोटोज् नुकतेच समोर आले असून, त्यात ती पती आणि मुलासोबत स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. फोटोमध्ये शिल्पा ब्लॅक बिकिनीमध्ये दिसत असून, तिचा हा हॉट अंदाज चाहत्यांकडून चांगलाच पसंत केला जात आहे, तर आणखी काही फोटोंमध्ये शिल्पा मुलगा विआनसोबत टाइम स्पेंड करताना दिसत आहे. 





दरम्यान, बी-टाउनमधील बरेचसे सेलिब्रिटी सध्या विदेशात असून, त्यांच्या या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत आहेत. काही फोटोंवरून ते वादाच्या भोवºयातही सापडत आहेत. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि दिशा पटानी यांनी तर त्यांचे बिकिनी फोटो शेअर करून सोशल मीडियावर आग लावली आहे. आता या यादीत मम्मी शिल्पा शेट्टीचाही समावेश झाल्याने सध्या सोशल मीडियावर या अभिनेत्रींचाच बोलबाला आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. 

Web Title: Shilpa Shetty arrives in Dubai for New Year Celebration, see photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.