Shilpa Shettyनं सोशल मीडियाला ठोकला रामराम, शेवटच्या पोस्टमध्ये सांगितलं कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 01:21 PM2022-05-12T13:21:00+5:302022-05-12T13:22:31+5:30

Shilpa Shetty : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर किती अ‍ॅक्टिव्ह आहे, हे नव्यानं सांगायची गरज नाही. पण आता नसणार. शिल्पानं सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे.

Shilpa Shetty Break From Social Media Shares Last Post And Wrote So Bored Of The Monotony | Shilpa Shettyनं सोशल मीडियाला ठोकला रामराम, शेवटच्या पोस्टमध्ये सांगितलं कारण....

Shilpa Shettyनं सोशल मीडियाला ठोकला रामराम, शेवटच्या पोस्टमध्ये सांगितलं कारण....

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty ) सोशल मीडियावर किती अ‍ॅक्टिव्ह आहे, हे नव्यानं सांगायची गरज नाही. पण आता नसणार. होय, शिल्पा आता सोशल मीडियावर नसणार. चित्रपट असो, शो असो शिल्पा अगदी त्याबद्दलची क्षणाक्षणाचं अपडेट देते. पर्सनल लाईफबद्दलचे अनेक व्हिडीओ, फोटोही ती सोशल मीडियावर शेअर करते. इतकेच नाही तर सोशल मीडियावरचे तिचे फिटनेस व्हिडीओही चाहते आवडीने बघतात. पण आता चाहते हे सगळं मिस करणार आहेत. शिल्पानं सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. आपली अखेरची पोस्ट शेअर करत, शिल्पानं यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे. (Shilpa Shetty Break From Social Media )

शिल्पानं फक्त ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट बॅकग्राऊंड असलेला फोटो शेअर करत, आपल्या या निर्णयाची माहिती दिली आहे. ‘मी या मोनोटनी (नीरसपणा)ला कंटाळली आहे. सगळं काही एकसारखं दिसतं. जोपर्यंत एक नवा अवतार पाहायला मिळत नाही, तोपर्यंत सोशल मीडियापासून दूर जातेय,’असं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिनं म्हटलं आहे. ट्विटरवरही तिनं याच आशयाची पोस्ट शेअर केली आहे.

शिल्पाची सोशल मीडियावर तगडी फॉलोइंग आहे. इन्स्टाग्रामवर तिला 25.4 मिलियन लोक फॉलो करतात तर ट्विटरवर तिचे 6.4 फॉलोअर्स आहेत. दोनच दिवसांआधी शिल्पानं इन्स्टावर एक मोटिवेशनल पोस्ट शेअर केली होती. ‘स्वत:वर विश्वास ठेवा आणि एक उत्तम व्यक्ती बना,’असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्याआधी आपल्या दोन्ही मुलांसोबतचा एक क्यूट व्हिडीओ तिनं शेअर केला होता.

शिल्पा सध्या गोव्यात आहे. येथे ‘इंडियन पुलिस फोर्स’ या रोहित शेट्टीच्या सीरिजचं शूटींग सुरू आहे. रोहित शेट्टीच्या सीरिजमध्ये ती महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा लुकही आऊट झाला आहे. या सीरिजद्वारे रोहित शेट्टी ओटीटीवर डेब्यू करतोय. यात शिल्पासोबत सिद्धार्थ मल्होत्रा व विवेक ओबेरॉय आहेत.

Web Title: Shilpa Shetty Break From Social Media Shares Last Post And Wrote So Bored Of The Monotony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.