शिल्पा शेट्टीच्या लेकीचा 3 वाढदिवस झाला दणक्यात साजरा, पाहा सेलिब्रेशनचा Inside Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 16:32 IST2023-02-20T16:23:17+5:302023-02-20T16:32:43+5:30
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची लाडकी लेक समिशाच्या बर्थ डे अनेक स्टारकिड्सनी हजेरी लावली होती. या बर्थ डे पार्टीतील इनसाईड व्हिडीओ व्हायरल होतोय.

शिल्पा शेट्टीच्या लेकीचा 3 वाढदिवस झाला दणक्यात साजरा, पाहा सेलिब्रेशनचा Inside Video
Shilpa Shetty Daughter Samisha Birthday: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची लाडकी लेक समिशा शेट्टी कुंद्रा तीन वर्षांची झाली आहे. अभिनेत्रीने तिच्या छोट्या परीच्या वाढदिवसाचं ग्रँड सेलिब्रेशन केलं. समिशाच्या बर्थ डे पार्टीला बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार आपल्या चिमुकल्यांसोबत आलं होते. शिल्पाने आता तिच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीचा एक इनस्टाईड व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पेप्पा पिग थीम असलेल्या ग्रँड बर्थडे बॅशच्या व्हिडिओमध्ये, शिल्पाची प्रिंसेस समिशा तिचा भाऊ विआन आणि इतर मुलांसोबत मजा करताना दिसत आहे. यादरम्यान ती अनेक राइड्स आणि गेम्सचा आनंद घेताना दिसली. समिशाने
वडील राज कुंद्रा आणि मावशी शमिता शेट्टी यांच्यासोबत अनेक फोटो क्लिक केले. चित्रपट निर्माता करण जोहर समिशाच्या वाढदिवसाला त्याची दोन मुले रुही आणि यशसोबत पोहोचला होता. तर तुषार कपूर मुलगा लक्ष्यसोबत आला होता. यावेळी ईशा देओल, निकेतन धीर आणि राणी मुखर्जी देखील स्पॉट झाली.
व्हिडीओ शेअर करत शिल्पा म्हणाली कि, 'जेव्हा तुम्ही तुमच्या ३ वर्षांच्या मुलीचा पहिल्यांदा वाढदिवस साजरा करता तेव्हा ते एक मिनी-वेडिंग सेलिब्रेशन होते.' कोविडमुळे शिल्पा शेट्टीच्या लेकीचं दोन वर्ष घरातच बर्थडे साजरा करण्यात आला. त्यामुळे या वर्षी अभिनेत्रीने लेकीच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन केलं आहे.शिल्पा शेट्टी वयाच्या ४५ व्या वर्षी सरोगसीद्वारे दुसऱ्यांदा मुलीची आई बनली आहे.