Video : आली लहर, केला कहर... ! शिल्पा शेट्टीनं चक्क धावत्या बसमध्येच उरकलं वर्कआऊट!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 04:02 PM2022-05-02T16:02:28+5:302022-05-02T16:05:16+5:30
Shilpa Shetty : कितीही बिझी शेड्यूल असलं तरी व्यायाम चुकवायचा नाही, हे शिल्पानं मनाशी पक्क ठरवलं आहे. केवळ ठरवलंच नाही तर हे ती तंतोतंत फॉलो करते. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा.
शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty ) बॉलिवूडची सर्वात फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अगदी एकदिवसही ती वर्कआऊट विसरत नाही. म्हणूनच वयाची पंचेचाळिशी गाठलेली शिल्पा या वयातही अगदी स्लिम ट्रिम आणि फिट आहे. कितीही बिझी शेड्यूल असलं तरी व्यायाम चुकवायचा नाही, हे शिल्पानं मनाशी पक्क ठरवलं आहे. केवळ ठरवलंच नाही तर हे ती तंतोतंत फॉलो करते. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा. शिल्पानं चक्क धावत्या बसमध्येच वर्कआऊट सुरू केलं.
अलीकडे शिल्पा एका फॅशन वीकसाठी गेली होती. हा इव्हेंट पूर्ण करून शिल्पा आज सोमवारी मुंबईत परतली. या दरम्यान तिला व्यायामासाठी कदाचित वेळ मिळाला नसावा. मग काय? फ्लाईटमधून एअरपोर्ट टर्मिनलपर्यंत येत असताना शटलच्या आत तिने संधी साधली. बसमध्ये कुणीच नाही, हे पाहून तिने धावत्या बसमध्येच वर्कआऊट सुरू केलं. तिने पुशअप्स, लंजेस, पुल अप्स केलेत. ‘मंडे मोटिवेशन’ नावानं तिने या वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सुरुवातीला बसच्या दरवाजाच्या हँडलला पकडून तिने पुशअप्स आणि पुलअप्स केले. त्यानंतर बसला वरच्या बाजुला असलेले हॅण्डल्स पकडून तिने कंबरेचा एक व्यायाम केला. त्यानंतर चक्क ती एका सीटवर चढली, वरच्या हॅण्डलला पकडले आणि डबलबारवर ज्या पद्धतीने व्यायाम करता येतो, त्या पद्धतीचा व्यायाम केला. एवढंच नाही, तर व्यायाम झाल्यानंतर पर्समधून टिश्यू पेपर काढला आणि व्यायाम करताना जिथे जिथे हात लावला, पाय लावला होता, ती सगळी जागा स्वच्छ पुसूनही घेतली. शिल्पाने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शिवाय फिट इंडिया आणि स्वच्छ भारत अभियान, असा संदेशही दिला.