VIDEO : वर्कआउट करताना 'बेशुद्ध' पडली Shilpa Shetty? म्हणाली - 'मार डाला अल्लाह'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 15:15 IST2022-02-01T15:13:39+5:302022-02-01T15:15:23+5:30
Shilpa Shetty : शिल्पाने वर्कआउट सेशनमधून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शिल्पा थकून जमिनवर 'बेशुद्ध' पडलेली दिसत आहे.

VIDEO : वर्कआउट करताना 'बेशुद्ध' पडली Shilpa Shetty? म्हणाली - 'मार डाला अल्लाह'
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty Workout) किती फिटनेस फ्रीक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. ती तिच्या जिम वर्कआउट, योगा, मेडिटेशन, डाएट सर्व गोष्टींची पूर्ण काळजी घेते. शिल्पाने वर्कआउट सेशनमधून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शिल्पा थकून जमिनवर 'बेशुद्ध' पडलेली दिसत आहे.
शिल्पा प्रत्यक्षात बेशुद्ध नाही. पण जानेवारी महिन्याच्या अखेरच्या दिवसाचं वर्कआउट सेशन जरा जास्तच वेळ चाललं. जास्त वेळ चाललेल्या या वर्कआउट सेशननंतर शिल्पा पूर्णपणे थकली होती आणि जमिनीवर लेटलेली होती. हा मजेदार व्हिडीओ तिने शेअर केलाय. शिल्पाला अशा स्थितीत पाहून तिची ट्रेनरही हसते. या व्हिडीओ तिने कॅप्शन दिलं आहे की, 'मंडे मोटीवेशन, मार डाला...अल्लाह...'.
शिल्पाने या व्हिडीओतून तिचा फनी स्वभावही दाखवला आहे. तर कॅप्शनमधून तिने फॅन्सना एक्सरसाइजसाठी मोटिवेट केलं आहे. तिने लिहिलं की, 'आजचं फिटनेस सेशन जानेवारी २०२२चं खूप जास्त वेळ चाललं. महिन्याचा शेवट, मोटिवेट करणं, मॅटवर लेटून राहणं आणि स्वत:ला एक महिन्यासाठी मानसिक रूपाने तयार करण्याचा आहे. पण हो, मलाही असे दिवस बघावे लागतात. फक्त एक गोष्ट मला प्रेरित करते, ती म्हणजे तुमचं प्रेम. आणि मग परत मी माझ्या रूपात येते'.