पोर्नोग्राफी प्रकरणावर राज कुंद्रा बनवणार चित्रपट, तुरुंगात ६३ दिवसांत नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 11:51 AM2023-07-20T11:51:02+5:302023-07-20T11:55:21+5:30

पोर्नोग्राफी प्रकरणावर राज कुंद्रा चित्रपट काढणार आहे. तुरुंगातील ६३ दिवसांवर आधारित सिनेमाची कथा असणार आहे.

shilpa shetty husband raj kundra to make movie on pornography arthur road jail incidence | पोर्नोग्राफी प्रकरणावर राज कुंद्रा बनवणार चित्रपट, तुरुंगात ६३ दिवसांत नेमकं काय घडलं?

पोर्नोग्राफी प्रकरणावर राज कुंद्रा बनवणार चित्रपट, तुरुंगात ६३ दिवसांत नेमकं काय घडलं?

googlenewsNext

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जुलै २०२१ मध्ये राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात राज कुंद्रा ६३ दिवस तुरुंगात होता. त्यानंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली होती. अश्लील व्हिडिओ बनवून ते प्रसारित केल्याचा आरोप त्याच्यावर होता.

मीडिया रिपोर्टनुसार, राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरण आणि तुरुंगात घालवलेल्या ६३ दिवसांवर चित्रपट बनवणार आहे. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, कुंद्राच्या आयुष्यातील या घटनेवर बनवण्यात येणाऱ्या चित्रपटाची कथा लिहिण्याचं काम सुरू आहे. कुंद्राने तुरुंगात घालवलेल्या दिवसांवर आधारित या चित्रपटाची कथा असणार आहे. या चित्रपटात राज कुंद्रा अभिनय करताना दिसणार आहे. त्याची भूमिका तो स्वत:च साकारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मणिपूरमधील महिला अत्याच्याराच्या व्हिडिओवर अक्षयची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला, “गुन्हेगारांना...”

राज कुंद्रा या चित्रपटाचं दिग्दर्शन कोण करणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. चित्रपटाच्या कथेपासून ते निर्मितीपर्यंत राज कुंद्रा स्वत: लक्ष घालणार आहे. या चित्रपटात पोर्नौग्राफी प्रकरणात राज कुंद्रावर झालेले आरोप ते तुरुंगवास यावर चित्रपटातून भाष्य करण्यात येणार आहे.

दरम्यान, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने २००९ साली विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्यांना विवान आणि समीशा ही दोन मुले आहेत.

Web Title: shilpa shetty husband raj kundra to make movie on pornography arthur road jail incidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.