शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रानं स्वतःसाठी खरेदी केली आलिशान कार; किंमत कोटींच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 12:03 PM2024-08-01T12:03:47+5:302024-08-01T12:07:31+5:30

राज कुंद्राने एक आलिशान कार खरेदी केली आहे

Shilpa Shetty-Raj Kundra Buy Sports Car Worth Rs. 3 Cr After ED Seized Their Property | शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रानं स्वतःसाठी खरेदी केली आलिशान कार; किंमत कोटींच्या घरात

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रानं स्वतःसाठी खरेदी केली आलिशान कार; किंमत कोटींच्या घरात

Raj Kundra New Car : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योगपती राज कुंद्रा हे सेलिब्रेटी कपल म्हणून लोकप्रिय आहे. राज कुंद्रा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ईडी किंंवा कुठल्याही वादामुळे नाही तर त्याच्या नव्याकोऱ्या कारमुळे. राज कुंद्राने एक आलिशान कार खरेदी केली आहे, ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

राज कुंद्रा आपल्या मुलासोबत नवीन कारमधून फिरताना दिसला. राजने हिरव्या रंगाची Lotus Eletre कार खरेदी केली आहे. या गाडीच्या रंगानं आणि तिच्या इंटिरियरनं सर्वांच लक्ष वेधलं आहे.  ही एक ब्रिटीश लक्झरी स्पोर्ट्स कार आहे. या कारची किंमत लाखांमध्ये नाही तर कोटींमध्ये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारची किंमत 3 कोटी रुपये आहे.


राज कुंद्राकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. आता या कार कलेक्शनमध्ये आणखी एक शानदार कार झाली आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये Porsche Cayenne, BMW i8, Mercedes Benz GL350 CDI आणि Bentley Flying Spur यांचा समावेश आहे. शिल्पा आणि राजने 22 नोव्हेंबर 2009 रोजी लग्न केलं. 21 मे 2012 रोजी त्यांना मुलगा झाला. त्याचं नाव विवान असं आहे. 2020 साली राज आणि शिल्पाला एक मुलगी झाली. तिचं नाव समीक्षा असं ठेवलं आहे. मिशाचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला.


दरम्यान एप्रिल महिन्यात राज कुंद्रा याची  ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली होती.  यामध्ये शिल्पा शेट्टीचा जुहू येथील बंगला, पुण्यातील निवासी बंगला आणि कुंद्राच्या नावावरील इक्विटी शेअर्स याचा समावेश होता. राज कुंद्रावर बिटकॉइन घोटाळा केल्याचा आरोप लावण्यात आला. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा म्हणजेच PMLA, 2002 अंतर्गत राज कुंद्रावर ही कारवाई करण्यात आली. याआधी पॉर्नोग्राफी प्रकरणात २०२१ साली राज कुंद्राला अटक केली होती. अश्लील चित्रपट बनवण्याचं रॅकेट चालवतं असल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. अनेक महिलांनी राज कुंद्राविरोधात साक्ष दिली होती.  याप्रकरणी तो २ महिने जेलमध्ये होता. सप्टेंबर २०२१मध्ये त्याची जेलमधून सुटका झाली.

Web Title: Shilpa Shetty-Raj Kundra Buy Sports Car Worth Rs. 3 Cr After ED Seized Their Property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.