शिल्पा शेट्टी म्हणतेय, आत्मसुखाचा शोध घ्यायला शिकवेल 'सुखी'

By संजय घावरे | Published: September 21, 2023 05:24 PM2023-09-21T17:24:26+5:302023-09-21T17:25:35+5:30

Shilpa Shetty : वास्तव जीवनात कायम आनंदी दिसणारी शिल्पा शेट्टी-कुंद्रा सध्या 'सुखी' या चित्रपटामुळे लाईमलाईटमध्ये आहे. या चित्रपटात तिने एका गृहिणीची व्यक्तिरेखा साकारली आहे.

Shilpa Shetty says, 'Sukhi' will teach you to find self-satisfaction | शिल्पा शेट्टी म्हणतेय, आत्मसुखाचा शोध घ्यायला शिकवेल 'सुखी'

शिल्पा शेट्टी म्हणतेय, आत्मसुखाचा शोध घ्यायला शिकवेल 'सुखी'

googlenewsNext

वास्तव जीवनात कायम आनंदी दिसणारी शिल्पा शेट्टी-कुंद्रा (Shilpa Shetty-Kundra) सध्या 'सुखी' (Sukhee) या चित्रपटामुळे लाईमलाईटमध्ये आहे. या चित्रपटात तिने एका गृहिणीची व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने काही गोष्टी प्रथमच केल्या आहेत. याबाबत शिल्पाने 'लोकमत'शी गप्पा मारताना सांगितले.

>> संजय घावरे

- 'सुखी' हे शीर्षक तुझ्या स्वभावासारखे वाटते. तुचं मत काय?
मी कायम आनंदी असते असं सर्वांनाच वाटतं. 'सुखी' चित्रपटातही मी सुखीच दिसणार आहे. हि सुखप्रीत कालरा नावाच्या गृहिणीची कथा आहे. हिला प्रेमाने सर्व सुखी म्हणतात. २० वर्षांपूर्वीची सुखी आणि आताची सुखी यात खूप फरक आहे. 

- सुखी आणि इतर गृहिणींमध्ये काय फरक आहे?
या चित्रपटातील सुखी इतर गृहिणींसारखीच आहे, पण तीन जीवलग मित्रांना भेटण्यासाठी रियुनियनला गेल्यावर तिला काही गोष्टींची जाणीव होते. हे रियुनियन तिला स्वत:चा शोध घेण्यासाठी फायदेशीर ठरतं. एक अॅचिव्हर आणि टॅापर राहिलेली आपल्यातील मुलगी कुठेतरी हरवल्याची जाणिव तिला होते. तिला शोधण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. अत्यंत मनोरंजकरीत्या हे सादर करण्यात आलं आहे.

- या चित्रपटात कोणत्या नवीन गोष्टी शिकता आल्या?
प्रत्येक चित्रपट आणि कॅरेक्टर कलाकाराला नवनवीन गोष्टी शिकवत असतं. या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. संपूर्ण चित्रपटाची जबाबदारी सुखीच्या खांद्यावर असल्याने हे कॅरेक्टर खूप आव्हानात्मक होतं. एकाच व्यक्तिरेखेमध्ये दोन परस्परभिन्न स्वभावाच्या छटा दाखवायच्या होत्या. त्यामुळे आजवरच्या करियरमध्ये प्रथमच वर्कशॅाप केलं. इथे मला स्वत:च्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून कॅरेक्टरकडे पाहण्याची कला शिकता आल्याने सुखी लवकर गवसली. 

- सोनल जोशींच्या दिग्दर्शनाची खासियत काय?
सोनाल ही एक उत्तम दिग्दर्शिका आहे. कागदावरचं पडद्यावर अचूकपणे उतरवण्याची कला तिच्या अंगी आहे. एखादी गोष्ट समोरच्याला कशी समजावून सांगणंही तिला चांगलं जमतं. तिच्या या गुणांची मदत सुखी साकारण्यासाठी झाली. बिकट परिस्थितीतही लोकांना हसवण्याचं श्रेय दिग्दर्शिका सोनल जोशीला देईन. तिने अतिशय प्रेमाने आणि संवेदशीलतेने हा चित्रपट बनवला आहे.

Web Title: Shilpa Shetty says, 'Sukhi' will teach you to find self-satisfaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.