वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी शिल्पा शेट्टीच्या लेकाने सुरु केला बिझनेस; कमाईची रक्कम करणार दान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 12:19 IST2022-08-29T12:19:08+5:302022-08-29T12:19:42+5:30
Shilpa shetty: शिल्पाचा लेक अवघ्या १० वर्षांचा असून त्याने एवढ्या लहान वयात त्याचा बिझनेस सुरु केला आहे.

वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी शिल्पा शेट्टीच्या लेकाने सुरु केला बिझनेस; कमाईची रक्कम करणार दान
सध्याच्या काळात सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिड्सची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते. हे स्टारकिड्स कधी त्यांच्या अतरंगी वागण्यामुळे तर कधी क्युटनेसमुळे चर्चेत येत असतात. मात्र, सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) लेक त्याच्या बिझनेसमुळे चर्चेत येत आहे. शिल्पाचा लेक अवघ्या १० वर्षांचा असून त्याने एवढ्या लहान वयात त्याचा बिझनेस सुरु केला आहे.
शिल्पा उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक यशस्वी व्यावसायिकदेखील आहे. तिचे अनेक हॉटेल्स आहेत. इतकंच नाही तर तिचा नवरा राज कुंद्रादेखील यशस्वी बिझनेसमन आहे. त्यामुळेच आता त्यांच्या लेकाने आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण केलं आहे. वियानने अवघ्या १० व्या वर्षी स्वत:चा शूजचा ब्रँड सुरु केला आहे.
अलिकडेच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत त्याच्या ब्रँडची माहिती दिली.
वियानने त्याचा स्वत:चा कस्टमाइज शूजचा बिझनेस सुरु केला आहे. VRKICKS असं त्याच्या ब्रँडचं नाव असून या ब्रँड अंतर्गत त्याने सगळ्यात प्रथम शिल्पासाठी खास शूज डिझाइन केले. या शूजची स्टार्टिंग किंमत ४ हजार ९९९ रुपये इतकी आहे. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्रामवर वियानचा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये आपल्या लेकाच्या बिझनेसविषयी लिहिलं आहे.
"माझा मुलगा वियान राजचा पहिला आणि युनिक बिझनेस वेंचर VRKICKS. या ब्रँड अंतर्गंत कस्टमाइज्ड स्नीकर शूज तयार केले जातात. लहान मुलांना आणि त्यांच्या स्वप्नांना कायमच पाठिंबा दिला पाहिजे. या वेंचरच्या संकल्पनेपासून ते स्वप्न सत्यात उतरवण्यापर्यंत, अगदी व्हिडीओदेखील करण्यापर्यंत सारं काही त्याने स्वत: केलं आहे. एवढ्याशा लहान वयात आपल्या कमाईची रक्कम एका चॅरिटीला देण्याचा निर्णयदेखील त्याने घेतला आहे. आता तो केवळ १० वर्षांचाच आहे", असं शिल्पाने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान, शिल्पाचा लेक वियान सोशल मीडियावर फारसा सक्रीय नाही. मात्र, त्याच्यातील कलागुणांमुळे तो कायम चर्चेत येत असतो. वियान उत्तम डान्सर असून फिटनेसमध्ये तो अभिनेता टायगर श्रॉफला फॉलो करत असल्याचं पाहायला मिळतं.