शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची ९७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 12:39 PM2024-04-18T12:39:30+5:302024-04-18T12:40:13+5:30
प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) ला अंमलबजावणी संचालनालय (Directorate of Enforcement) म्हणजेच ईडीनं (ED) दणका दिला आहे. राज कुंद्रा याची ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त (Property Seized) करण्यात आली आहे. आज सकाळीच ईडीने ही मोठी कारवाई केली आहे.
ईडीने कुंद्राच्या ज्या मालमत्ता जप्त केल्या आहेत, त्यात शिल्पा शेट्टीच्या जुहू येथील बंगल्याचाही समावेश आहे. तसेच पुण्यात असलेला निवासी बंगला आणि कुंद्राच्या नावावरील इक्विटी शेअर्सदेखील ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा म्हणजेच PMLA, 2002 अंतर्गत राज कुंद्रावर ही कारवाई करण्यात आली आहे. राज कुंद्रावर बिटकॉइन घोटाळा केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
ED, Mumbai has provisionally attached immovable and movable properties worth Rs 97.79 crores belonging to Ripu Sudan Kundra aka Raj Kundra under the provisions of PMLA, 2002. The attached properties include a Residential flat situated in Juhu presently in the name of Smt. Shilpa…
— ANI (@ANI) April 18, 2024
दरम्यान, पॉर्नोग्राफी प्रकरणात २०२१ साली राज कुंद्राला अटक केली होती. अश्लील चित्रपट बनवण्याचं रॅकेट चालवतं असल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. अनेक महिलांनी राज कुंद्राविरोधात साक्ष दिली होती. याप्रकरणी तो २ महिने जेलमध्ये होता. सप्टेंबर २०२१मध्ये त्याची जेलमधून सुटका झाली. तेव्हापासून राज मास्क घालून फिरत होता. त्याला मास्क मॅन असं नावही पडलं होतं