का उडवली जातेय शिल्पा शेट्टीची ‘खिल्ली’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2016 01:10 PM2016-11-29T13:10:56+5:302016-11-29T13:23:48+5:30

ट्विटर ही दुधारी तलवार आहे. ही मायक्रोब्लॉगिंग साईट सेलिब्रेटींसाठी एका तऱ्हेने वरदान आणि अभिशाप दोन्ही आहे. आलियाला तिच्या सामन्य ...

Shilpa Shetty's 'Khali' | का उडवली जातेय शिल्पा शेट्टीची ‘खिल्ली’

का उडवली जातेय शिल्पा शेट्टीची ‘खिल्ली’

googlenewsNext
विटर ही दुधारी तलवार आहे. ही मायक्रोब्लॉगिंग साईट सेलिब्रेटींसाठी एका तऱ्हेने वरदान आणि अभिशाप दोन्ही आहे. आलियाला तिच्या सामन्य ज्ञानावरून पुरते हैराण करून सोडल्यानंतर ट्विपलर्सना आता शिल्पा शेट्टीच्या निमित्ताने नवीन ‘शिकार’ मिळाली आहे.

ते कसे सांगण्यापूर्वी आचार्य अत्रेंचा एक किस्सा सांगणे गरजेचे आहे. एकदा अत्रे ग्रंथालयात गेले आणि ग्रंथपालाकडे  ‘झेंडूची फुले’ हा त्यांचा कवितासंग्रह मागितला. एक-दोन तास शोधूनही कर्मचाऱ्याला तो काही सापडला नाही. ग्रंथपालांनी डोळे मोठे केल्यावर तो बिचार पुन्हा शोधू लागला. अखेर एका तासाने तो पुस्तक घेऊन परत आला. कुठे होते पुस्तक असे विचारले तेव्हा तो म्हणाला, वनस्पतीशास्त्राच्या कपाटात! अशीच काहीशी गत झाली बिचाऱ्या शिल्पा शेट्टीची! 

प्राण्यांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांच्यावर प्रेम करण्याचे धडे लहान मुलांना देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात ‘अ‍ॅनिमल फार्म’ या पुस्तकाचा समावेश करायला हवा, अशी ‘अजब-गजब’ सूचना तिने एका मुलाखतीलमध्ये केली.


अ‍ॅनिमल फार्म

‘आयसीएसई’ बोर्डाने इयत्ता तिसरी ते आठवीच्या अभ्यासक्रमात ‘हॅरी पॉटर’, ‘टिनटिन’, अस्टेरिक्स असे समकालिन साहित्य कलाकृतींचा समावेश केला आहे. याविषयी जेव्हा तिला विचारण्यात तेव्हा ती म्हणाली की, हा खूप चांगला निर्णय आहे. ‘लॉर्ड आॅफ द रिंग्ज’ आणि ‘हॅरी पॉटर’सारखी पुस्तके मुलांमधील कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी खूप परिणामकारक ठरू शकतात. त्याबरोबरच मला वाटते की, ‘लिटल वुमेन’मुळे महिलांचा आदर करण्याची करण्याची  शिकवण मिळेल तर ‘अ‍ॅनिमल फार्म’मधून लहान मुलांना प्राण्यांबद्दल प्रेम आणि त्यांची काळजी कशी घ्यायची हे शिकवले जाऊ शकते.’

एकाधिकारशाही आणि मानवी हक्कांची गळचेपी करणाऱ्या स्टॅलिन राजवटीवर टीका करणाऱ्या या जॉर्ज आॅरवेल लिखित ‘अ‍ॅनिमल फार्म’ कादंबरीला शिल्पने ‘‘चुकून’’ प्राणीशिक्षणाचे पुस्तक समजले आणि स्वत:चा हसे करून घेतले. 

बस्स झाले मग! सेलिब्रेटिंच्या तोंडून कधी एकदा वाकडा शब्द पडतो याची वाट पाहणाऱ्या ट्विटरकरांनी मग शिल्पाच्या अज्ञानाची ट्विटरवर चांगलीच खिल्ली उडवण्यास सुरूवात केली. सध्या ‘#शिल्पाटशेट्टीरिव्ह्युव्ज्’ असा हॅशटॅग ट्रेंडिंग होतोय. तिच्या अज्ञानाला टार्गेट करत मग लोकांनी या हॅशटॅगसह मजेशीर ट्विटस् केले.

जसे की, ‘फिफ्टी शेडस् आॅफ ग्रे’ हे पुस्तक मुलांना रंगाची माहिती देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात असायला हवे. ‘थाउजंड स्प्लेन्डिड सन्स’ हे पुस्तक सौरमालेविषयी आहे. असे आणखी काही भन्नाट ट्विटस -

                                                   

Web Title: Shilpa Shetty's 'Khali'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.