Shilpa Shirodkar : ‘छैय्या छैय्या’ गाणं शिल्पा शिरोडकरच्या नशीबात नव्हतंच..., यामुळे झाली होती रिजेक्ट...!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 08:00 AM2022-12-07T08:00:00+5:302022-12-07T08:00:01+5:30
Shilpa Shirodkar : ‘चल छैय्या छैय्या’ या गाण्यानं मलायकाला स्टार केलं. या गाण्यानं अशी काही जादू केली की सारेच मलायकाच्या प्रेमात पडले. पण या गाण्यासाठी मलायका पहिली पसंत नव्हतीच...
‘दिल से’ या सिनेमात शाहरुख खान, मनीषा कोईराला मुख्य भूमिकेत होते. मात्र शाहरुख आणि मनीषापेक्षाही मलायका अरोरावरच (Malaika Arora) सारे फिदा झाले. या सिनेमातील ‘चल छैय्या छैय्या’ (Chaiyya Chaiyya) हे मलायकाचं गाणं इतकं गाजलं की ती स्टार झाली. होय, या गाण्यानं मलायकाला स्टार केलं. तिच्या गाण्यातील ‘दिलखेचक अदा’ आणि ‘लटके झटके’ पाहून चाहते घायाळ झालेत. या गाण्यानं अशी काही जादू केली की सारेच मलायकाच्या प्रेमात पडले. पण खरं सांगायचं तर या गाण्यासाठी मलायका पहिली पसंत नव्हतीच. वाचून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. या गाण्यासाठी मलायका नाही तर शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar ) ही मेकर्सची पहिली पसंत होती.
शिल्पा शिरोडकरला या गाण्याची पहिली ऑफर देण्यात आली होती. मलायकाच्या जागी शिल्पा या गाण्यात ठुमके लावणार होती पण ऐनवेळी तिला या गाण्यातून काढून टाकण्यात आलं. का? तर वाढलेलं वजन. होय, छैय्या छैय्या गाण्यासाठी सर्वप्रथम शिल्पाला विचारणा झाली होती. पण नंतर ती जाड आहे, असं मेकर्सला वाटलं आणि त्यामुळे हे गाणं मलायकाकडे गेलं.
हे गाणं शिल्पा शिरोडकरने केलं असतं तर नक्कीच या गाण्यानं तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं असतं. शाहरूखसारख्या बड्या स्टारसोबत तिला काम करण्याची संधी मिळाली असती. अर्थात शिल्पाला याचा अजिबात पश्चाताप नाही. हा सगळा नशीबाचा खेळ आहे, असं ती मानते.
छैय्या छैय्या गाण्यात शाहरूखसोबत काम करण्याची संधी शिल्पाने गमावली. पण नंतर ‘गज गामिनी’ या सिनेमात तिला ही संधी मिळाली होती. एका सीनमध्ये दोघंही एकत्र दिसले होते.
शिल्पाने अवघ्या 20 व्या वर्षी आपल्या करियरची सुरुवात केली होती. एकेकाळची बोल्ड अभिनेत्री अशी तिची ओळख होती. गोविंदा, सुनील शेट्टी, अमिताभ, मिथुन आणि अक्षय कुमार या मोठ्या कलाकारांसोबत काम करणारी शिल्पा आता सिनेमांपासून दूर आहे आणि काळानुसार तिच्या लूकमध्येही बदल झाला आहे. शिल्पा 2010 मध्ये आलेल्या ‘बारुद’ या सिनेमात शेवटची झळकली होती.
11 जुलै 2000 रोजी शिल्पाने यूके येथील बँकर अपरेश रंजीतसोबत लग्न केलं. 2003 साली तिने मुलगी अनुष्काला जन्म दिला. 2000 साली लग्न झाल्यावर ती लंडनमध्ये शिफ्ट झाली.