शिवलिका ऑबेरॉय म्हणतेय, 'घराणेशाहीपेक्षा प्रेक्षक खूप जास्त महत्त्वाचे...'

By तेजल गावडे | Published: August 12, 2020 01:10 PM2020-08-12T13:10:38+5:302020-08-12T13:11:19+5:30

बॉलिवूड अभिनेत्री शिवलिका ऑबेरॉय लवकरच 'खुदा हाफिज' चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या निमित्ताने त्याच्याशी केलेली बातचीत...

Shivalika Oberoi says, 'Audience is more important than dynasty ...' | शिवलिका ऑबेरॉय म्हणतेय, 'घराणेशाहीपेक्षा प्रेक्षक खूप जास्त महत्त्वाचे...'

शिवलिका ऑबेरॉय म्हणतेय, 'घराणेशाहीपेक्षा प्रेक्षक खूप जास्त महत्त्वाचे...'

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री शिवलिका ऑबेरॉय लवकरच 'खुदा हाफिज' चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या निमित्ताने त्याच्याशी केलेली बातचीत...

अभिनय क्षेत्रात तू कशी आली?
मी कधी विचार नव्हता केला होता की मी एक अभिनेत्री बनेन. माझी आई-वडील वेगळ्या क्षेत्रातील आहे. मी एकटी सिनेइंडस्ट्रीतील आहे. माझे आजोबा महावीर ऑबेरॉय यांनी एकदा सिनेमा बनवला होता पण माझे वडील लहान असताना त्यांचे निधन झाले होते. तेव्हापासून आमचे फिल्मी जगताशी काहीच संबंध नव्हता. अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी मी असिस्टंट डिरेक्टरचे काम केले आहे. 'किक' आणि 'हाउसफुल 3' चित्रपटासाठी मी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. असिस्टंट डिरेक्टरनंतर मी खूप ऑडिशन्स दिले. त्यानंतर 'ये साली आशिकी' या सिनेमातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिका खूप वेगळी होती.या चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षकांकडून खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. 

'खुदा हाफिज' चित्रपटात काम करण्याची संधी तूला कशी मिळाली?
'ये साली आशिकी' चित्रपटानंतर मी पुन्हा ऑडिशन्स द्यायला सुरूवात केली. एक  दिवस मला पॅनोरमा स्टुडिओजमधून ऑडिशनसाठी फोन आला. ऑडिशन दिले, लूक टेस्ट झाली. चित्रपटाची कथा ऐकली. त्यानंतर निर्माते कुमार मंगत यांना भेटले. त्यानंतर मला एक महिन्यानंतर खुदा हाफिजसाठी माझी निवड झाल्याचे समजले. या चित्रपटात काम करण्यासाठी मी खूपच उत्सुक होते. कारण हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. अशा चित्रपटात मला एकदा तरी काम करायचे होते आणि मला दुसरा सिनेमा तसा मिळाला. त्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजते.

'खुदा हाफिज' चित्रपटातील तूझ्या भूमिकेबद्दल सांग?
'खुदा हाफिज'मध्ये मी नरगिसची भूमिका साकारली आहे. या भूमिकेबद्दल वाचल्यानंतर मी तिच्या प्रेमात पडली.त्यामुळे मला आशा आहे की नरगिस प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल. नरगिसच्या भूमिकेसाठी मला फार जास्त तयारी करावी लागली नाही. मी खूप जास्त बडबडी आहे. तर नरगिस खूप शांत आहे. ती जास्त बोलत नाही. तिचे डोळे खूप बोलके आहेत. लखनऊमधील सामान्य घरातील ती मुलगी आहे. तिच्यासाठी तीचे कुटुंबच सर्व काही आहे. नरगिस आणि माझ्यामध्ये बरेच साम्य आहे. 

विद्युत जामवालबद्दल काय सांगशील?
खुदा हाफिजच्या आधी विद्युत जामवालला पर्सनली ओळखत नव्हती. या चित्रपटाच्या वाचन आणि शूटिंगच्या वेळी ओळखू लागले. त्याचे अ‍ॅक्शन आणि फिटनेस पाहून मी खूप प्रेरीत झाले होते. भेटल्यानंतर मी आणखीन प्रेरीत झाले. तो त्याच्या फिटनेसकडे खूप लक्ष देतो आणि डाएट वगैरे न करता सर्व काही खातो. मीदेखील डाएट करत नाही. त्यामुळे सेटवर आम्ही फिटनेस व फूडबद्दल खूप बोलायचो. विद्युत खूप विनम्र व प्रेमळ आहे. पहिल्याच भेटीत त्याने खूप आत्मविश्वास दाखवला. इतका अनुभवी आणि टॅलेंटेड अभिनेत्याला चित्रपटाची स्क्रीप्ट वाचनाच्या वेळी पहिल्यांदा भेटताना मी खूप नर्व्हस झाले होते. त्याला भेटताच माझ्या मनावरील दडपण निघून गेले. त्यानंतर विद्युत जामवाल, दिग्दर्शक फारूख कबीर यांच्यासोबत खूप चांगले ट्युनिंग जमले. 

या चित्रपटाचा तुझा अनुभव कसा होता?
खूप छान व वेगळा अनुभव होता. सेटवर कौटुंबिक वातावरण होते. त्यामुळे काम करतोय असे वाटत नव्हते. प्रत्येक जण आपल्या कामाच्या बाबतीत खूप पॅशनेट होते. सेटवर सगळेच जण वेळेच्या आधीच हजर असायचे. त्यामुळे खूप मजा आली. तसेच एकमेकांना प्रोत्साहन देत होते. नरगिसची भूमिका उत्तमरित्या साकारण्यासाठी फारूख सरांनी खूप मदत केली आहे. त्यामुळे खूप अप्रतिम अनुभव होता.

बॉलिवूडमधील नेपोटिझमबद्दल तुझे मत सांग?
इनसाइडर असो किंवा आउट साइडर...सर्वांना समान संधी आणि प्लॅटफॉर्म दिला पाहिजे. जे चांगले काम करत आहेत त्यांच्या टॅलेंटचा आदर केला पाहिजे. आउडसाइडर इतके चांगले काम करत आहेत. जो टॅलेंटेड आहे त्याला काम दिले पाहिजे. मला घराणेशाहीपेक्षा प्रेक्षक खूप जास्त महत्त्वाचे वाटतात. जर जास्तीत जास्त लोकांनी चित्रपट पाहिला तर चित्रपट सुपरहिट ठरतो आणि त्या कलाकाराला दाद मिळते. हल्ली लोक आउट साइडरचेदेखील चित्रपट पाहतात. स्टारकिड्स पेक्षा आउट साइडर्सना ओळख थोडी उशीरा मिळते. कठोर मेहनत केली की यश नक्कीच मिळते, असे मला वाटते.

- तेजल गावडे 
 

Web Title: Shivalika Oberoi says, 'Audience is more important than dynasty ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.