शोएब मलिक-सना जावेदच्या अफेअरचा झाला खुलासा, 3 वर्षांपासून सानिया मिर्झाला देतोय 'धोका'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 01:41 PM2024-01-23T13:41:39+5:302024-01-23T13:42:55+5:30

शोएब आणि सना पहिल्यांदा कुठे भेटले?

Shoaib Malik had an affair with Sana Javed for three years Sania Mirza was upset with his extramarrital affair | शोएब मलिक-सना जावेदच्या अफेअरचा झाला खुलासा, 3 वर्षांपासून सानिया मिर्झाला देतोय 'धोका'

शोएब मलिक-सना जावेदच्या अफेअरचा झाला खुलासा, 3 वर्षांपासून सानिया मिर्झाला देतोय 'धोका'

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने (Shoaib Malik) दोन दिवसांपूर्वी तिसरं लग्न करत सर्वांना धक्का दिला. पाकिस्तानची टीव्ही अभिनेत्री सना जावेदसोबत (Sana Javed) त्याने निकाह केला. यानंतर सानिया मिर्झाच्या (Sania Mirza) कुटुंबियांनी प्रतिक्रिया देत सानियाने काही महिन्यांपूर्वीच खुला घेतल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर सानिया शोएबच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळली होती असा खुलासा शोएबच्याच बहिणीने केला. आता शोएब आणि सनाच्या लव्हस्टोरीचा खुलासाही झाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून शोएब सानियाला धोका देत असल्याचं उघड झालं आहे.

एका पाकिस्तानी पॉडकास्टमध्ये पत्रकार नईम हनीफने शोएब मलिक आणि सना जावेदमधील अफेअरचा धक्कादायक खुलासा केला. हनीफ यांच्यानुसार, दोघंही पहिल्यांदा एका रिअॅलिटी शोमध्ये भेटले. तिथेच ते एकमेकांच्या जवळ आले आणि एकमेकांविषयी त्यांच्या मनात आकर्षण निर्माण झालं. विशेष म्हणजे जेव्हा शोएबला टीव्ही कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं होतं तेव्हा त्याने निर्मात्यांना सना जावेदला बोलावण्याही विनंती केली होती. दोघंही आपापल्या पार्टनरसोबत खूश होते तरी त्यांच्यात आकर्षण निर्माण झालं. सानियाने शोएबच्या कुटुंबालाही याची माहिती दिली. शोएबच्या कुटुंबाने पुन्हा एकदा निर्णयाचा विचार करायला सांगितलं. मात्र अनेक प्रयत्नानंतरही शोएब आणि सानियाने नात्याला आणखी एक संधी दिली नाही आणि घटस्फोटाचाच निर्णय घेतला. शोएब मलिकच्या मोठ्या बहिणीचे पती इमरान जफरनेही दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र काहीच फरक पडला नाही.

दरम्यान अभिनेत्री सना जावेदच्या डिझायनर टीमकडून खुलासा करण्यात आला की दोघांचा निकाह अतिशय घाईघाईत झाला. इमर्जन्सीमध्ये नवरीच्या लग्नाच्या कपड्याची ऑर्डर त्यांना मिळाली होती. 

अभिनेत्री सना जावेदचं हे दुसरं लग्न आहे. 2020 साली तिने पाकिस्तानी अभिनेता उमैर जसवालसोबत निकाह केला होता. दोनच वर्षात आपापसातील मतभेदामुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. 

Web Title: Shoaib Malik had an affair with Sana Javed for three years Sania Mirza was upset with his extramarrital affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.