​Shock: पोस्टर लॉन्च झाल्यावर श्रुती हासनने सोडला ‘संघमित्रा’!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2017 09:47 AM2017-05-30T09:47:48+5:302017-05-30T15:17:48+5:30

श्रुती हासन अलीकडे कान्स फिल्म्स फेस्टिवलमध्ये दिसली. ‘संघमित्रा’ या आगामी चित्रपटाचे फर्स्ट लूक लॉन्च करायला ती कान्समध्ये पोहोचली होती. ...

Shock: Shruti Hassan leaves 'Sanghamitra' after launching poster! | ​Shock: पोस्टर लॉन्च झाल्यावर श्रुती हासनने सोडला ‘संघमित्रा’!

​Shock: पोस्टर लॉन्च झाल्यावर श्रुती हासनने सोडला ‘संघमित्रा’!

googlenewsNext
रुती हासन अलीकडे कान्स फिल्म्स फेस्टिवलमध्ये दिसली. ‘संघमित्रा’ या आगामी चित्रपटाचे फर्स्ट लूक लॉन्च करायला ती कान्समध्ये पोहोचली होती. यावेळी खुद्द ए. आर. रहेमान  श्रुतीसोबत कान्सच्या रेड कार्पेटवर उतरला होता. ‘संघमित्रा’चा फर्स्ट लूक लॉन्च करताना श्रुती या चित्रपटाबद्दल भरभरून बोलली होती. या चित्रपटाची तुलना  ‘बाहुबली’शी केली जायला नको. कारण हा चित्रपट एक पीरियड ड्रामा आहे. पण ‘बाहुबली’सारखा अजिबात नाही, असे श्रुती म्हणाली होती. एकंदर काय तर, श्रुती ‘संघमित्रा’बद्दल कमालीची उत्सूक होती. पण कान्सवरून परतल्यानंतर आठवडा होत नाही तर श्रुतीने हा चित्रपट सोडल्याची धक्कादायक बातमी येतेय. आता या बातमीला दोन पैलू आहेत.



श्रुतीच्या बाजुने बोलणाºयांनी सांगितले की, ‘संघमित्रा’साठी बराच वेळ हवा होता. पण चित्रपटाची टीम श्रुतीला ना पूर्ण स्क्रिप्ट देतेयं, ना डेट्सचे कॅलेंडर. त्यामुळे  श्रुतीने हा चित्रपट सोडणेच योग्य समजले. ‘संघमित्रा’च्या मेकर्सने मात्र वेगळीच स्टोरी सांगितले आहे. श्रुती हासन ‘संघमित्रा’साठी दोन वर्षे द्यायला तयार नव्हती. त्यामुळे तिने चित्रपट सोडला, असे मेकर्सने म्हटले आहे.
श्रुती सध्या आपल्या बॉलिवूड करिअवर लक्ष देत आहे. ‘लक’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण यानंतर बॉलिवूडमध्ये तिला फार यश गाठता आले नाही. नाही म्हणायला तिच्या नावावर ‘रॉकी हँडसम’,‘वेलकम बॅक’ सारखे चित्रपट आहेत. पण या चित्रपटांनी श्रुतीच्या करिअरला फार काही वेग दिला नाही. सध्या ती ‘बहन होगी तेरी’ या चित्रपटात व्यस्त आहे. यात ती राजकुमार रावसोबत दिसणार आहे.

Web Title: Shock: Shruti Hassan leaves 'Sanghamitra' after launching poster!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.