Shocking! ४ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या नात्याचा होणार The End?, कारण आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 16:46 IST2022-05-04T16:46:04+5:302022-05-04T16:46:35+5:30
मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांच्या रिलेशनशीपला जवळपास ४ वर्षे उलटून गेली आहेत.

Shocking! ४ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या नात्याचा होणार The End?, कारण आले समोर
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सतत वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. कधी ग्लॅमरस फोटो तर कधी अर्जुन कपूर(Arjun Kapoor) सोबतच्या रिलेशनशीपमुळेही ती चर्चेत येत असते. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या रिलेशनशीपला जवळपास ४ वर्षे उलटून गेली आहेत. या दोघांच्या नात्याची चर्चा सर्वत्र होताना दिसते. नुकतीच, या कपलबद्दल धक्कादायक बातमी समोर येत आहे. ४ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आता दोघंही वेगळे होणार आहेत, असे समजते आहे.
मलायका अरोराने अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आली. एका प्रसिद्ध न्यूज पोर्टलनुसार, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यात सध्या काही सुरळीत नाही. त्या दोघांमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून वाद सुरु आहे आणि मलायकाने स्वतःला घरात कैद करून घेतले आहे, असे बोलले जात आहे. असेही सांगितले जात आहे की, ती कोणालाही भेटू इच्छित नाही.
काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर त्याची बहीण रिया कपूरच्या घरी डिनरसाठी गेला होता. असे सांगितले जाते की यादरम्यान तो मलायका अरोराच्या घरी गेला नाही किंवा तिच्याशी बोलला नाही. रिया कपूर आणि मलायका अरोराचे घर शेजारी आहे. अर्जुन कपूर आणि मलायका लवकरच वेगळे होणार असल्याचे बोलले जात आहे. ४ वर्षांचे रिलेशन तुटण्याच्या मार्गावर आहे. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप तरी मलायका आणि अर्जुनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे हे वृत्त कितपत खरे आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.