SHOCKING !! ​ अक्षय कुमारला नक्षल्यांची धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2017 05:18 AM2017-05-29T05:18:36+5:302017-05-29T10:48:36+5:30

जवानांना मदत करणारा बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली आहे. नक्षली हल्ल्यात ...

SHOCKING !! Akshay Kumar threatens naxalite! | SHOCKING !! ​ अक्षय कुमारला नक्षल्यांची धमकी!

SHOCKING !! ​ अक्षय कुमारला नक्षल्यांची धमकी!

googlenewsNext
ानांना मदत करणारा बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली आहे. नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत करू नये, अशी धमकी नक्षलवाद्यांनी दिली आहे.  
 छत्तीसगडमधील सुकमा येथे मार्च महिन्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याात सीआरपीएफचे २५ जवान शहीद झाले होते. या शहीदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची घोषणा अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांनी केली होती. त्यानुसार अक्षयने शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ९ लाख रुपये तर सायना नेहवालने प्रत्येक कुटुंबाला ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली होती. 
 नक्षलवाद्यांनी त्यांच्या या कृतीचा निषेध व्यक्त करणारी पत्रके वाटली आहेत. पत्रकात ‘पीपल्स लिबरेशन आॅफ गुरिल्ला आर्मी’ने अक्षय व सायनाने शहीद जवानांच्या कुटुंबीयांना केलेल्या आर्थिक मदतीचा निषेध करत त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत न करण्याची धमकी दिली आहे. देशातील प्रसिद्ध व्यक्ती, कलाकार, खेळाडू आणि सेलिब्रिटींनी क्रांती आणि गरिबांच्या बाजून उभे राहावे, असे आवाहन आम्ही करतो. तसेच त्यांनी पोलिसांच्या अत्याचाराचा आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात आवाज उठवावा, असे नक्षलवाद्यांनी वाटलेल्या पत्रकांत म्हटले आहे. पोलिसांच्या मते नक्षलवाद्यांनी वाटलेली पत्रके सुकमा हल्ल्यापूर्वीच छापण्यात आल्याची शक्यता आहे. या पत्रकांमध्ये गोरक्षकांकडून दलित आणि मुस्लिमांवर करण्यात येणाºया हल्ल्यांवरही भाषय करण्यात आले आहे. मात्र, या पत्रकांमधून नक्षलवाद्यांनी घेतलेली भूमिका दुटप्पी आणि मानवताविरोधी असल्याचे पोलीस अधिकाºयांनी म्हटले आहे.

Web Title: SHOCKING !! Akshay Kumar threatens naxalite!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.