Shocking : हे सेलिब्रिटीदेखील झाले लैंगिक शोषणाचे शिकार !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 10:06 AM2017-11-26T10:06:46+5:302017-11-26T15:36:46+5:30
-रवींद्र मोरे बॉलिवूड कलाकारांचा स्ट्रगल प्रेक्षकांसाठी नेहमीच उत्सुकतेचा आणि प्रेरणा देणारा असतो. यात त्यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात सोसलेले अपमानाचे ...
बॉलिवूड कलाकारांचा स्ट्रगल प्रेक्षकांसाठी नेहमीच उत्सुकतेचा आणि प्रेरणा देणारा असतो. यात त्यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात सोसलेले अपमानाचे प्रसंग, हालाखी, उपासमारी, आॅडिशन्स, रिजेक्शन या गोष्टींचे वर्णन असते. पण काहीवेळा कास्टिंग काऊचचा सामनाही त्यांना करावा लागतो. इथे आपण बॉलिवूडच्या काही कलारांबद्दल वाचणार आहेत, ज्यांचे लैंगिक शोषण झाले होते.
* अक्षय कुमार
अक्षय जेव्हा ६ वषार्चा होता तेव्हा एका लिफ्ट आॅपरेटरने त्याला नको तिथे स्पर्श करुन चाळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अक्षयने ही गोष्ट आपल्या पालकांना सांगितली आणि नंतर त्या लिफ्ट आॅपरेटरवर कारवाई झाली. ही गोष्ट अक्षयने आपल्या मुलाखतीत सांगितली होती.
* सोनम कपूर
सोनम १३ वषार्ची असताना सिनेमाला गेली होती. तेव्हा एका व्यक्तीने नकळत तिला स्पर्श करणे सुरू केले. हा स्पर्श तिच्यासाठी खूपच घाणेरडा होता. ही गोष्ट तिने एका मुलाखतीत सांगितली होती.
* तापसी पन्नू
जी गोष्ट तापसीच्या बाबतीत घडली ती गोष्ट अनेक मुलींच्या बाबतीत घडल्याचे दिसून आले आहे. दोन व्यक्ती बाईकवरुन तिच्या जवळ आल्या आणि अश्लिल बोलत हसू लागल्या. पण तापसीने त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता ती त्यांना तिथेच ठाम उभी राहून पाहात राहिली. तिचा हा पवीत्रा पाहून ते निघून गेले. ही गोष्ट तिने सांगितली होती.
* कल्की कोयचलिन
कल्कि नेहमीच महिलांचे अधिकार, लैंगिक भेदभाव आणि लैंगिक शोषण याबद्दल आपली मते ठामपणे मांडत असते. तिनेदेखील आपल्यावर लैंगिक शोषणाचा प्रसंग ओढवल्याचे सांगितले होते. त्यावेळी ती ९ वर्षांची होती.
*कंगना रानावत
अलिकडचा विषय केला तर कंगना सध्या महिला सक्षमीकरणाची चॅम्पियन ठरली आहे. आपल्या आयुष्यामध्ये चुकीच्या व्यक्तींनी गैरफायदा घेण्याचा कसा प्रयत्न केला हे तिने स्पष्टपणे कथन केलेले आहे. करियरच्या सुरुवातीच्या काळात अभिनेत्यांनी तिचे लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचे तिने मुलाखतीत स्पष्ट केले होते.
* अनुराग कश्यप
लहान वयातच आपल्यावर लैंगिक शोषणाचा प्रसंग ओढवला होता हे दिग्दर्शक अनुराग कश्यप याने मुलाखतीत सांगितले होते.
* सोफिया हयात
गायिका मॉडेल असलेली सोफिया हयातवरदेखील लहानपणीच लैंगिक अत्याचार झाले होते. विशेष म्हणजे तिच्या काकानेच तिला हा घाणेरडा अनुभव दिला होता. त्यावेळी ती केवळ १० वर्षांची होती.