Shocking : शमा सिकंदरकडे एका प्रसिद्ध दिग्दर्शकांनी केली शरीरसुखाची मागणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 02:18 PM2017-08-31T14:18:30+5:302017-08-31T19:48:30+5:30
काही दिवसांपूर्वी तिने आरोप केला होता की, इंडस्ट्रीमधील एक मोठा दिग्दर्शक तिच्याशी कास्टिंग काउचसाठी अॅप्रोच झाला होता. त्याने माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती.
श ा सिकंदर तुम्हाला आठवतेय काय? ‘यह मेरी लाइफ हैं’ या टीव्ही शोमध्ये तिने पूजाची भूमिका साकारली होती. होय, तिच.. काही दिवसांपूर्वी ‘सेक्सोहॉलिक’ या शॉर्ट फिल्ममध्ये ती बघावयास मिळाली होती. यामध्ये तिने सेक्स अॅडिक्टेड महिलेची भूमिका साकारली होती. आता लवकरच ती एका नव्या शॉर्ट फिल्ममध्ये बघावयास मिळणार आहे. शमा गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. परंतु अजूनही तिला मोठा ब्रेक मिळालेला नाही. यास तिचा स्वभाव कारणीभूत असल्याचे बोलले जाते. कारण दिग्दर्शकांसोबत कुठल्याही प्रकारची तडजोड करायची नाही, असे तिचे धोरण राहिले आहे. काही दिवसांपूर्वी तिने आरोप केला होता की, इंडस्ट्रीमधील एक मोठा दिग्दर्शक तिच्याशी कास्टिंग काउचसाठी अॅप्रोच झाला होता. त्याने माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती.
सिद्धार्थ काननला दिलेल्या एका मुलाखतीत शमाने हा खळबळजनक खुलासा केला होता. जेव्हा तिला कास्टिंग काउचविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने म्हटले की, इंडस्ट्रीत मोठ्या स्तरावर नव्हे परंतु काही प्रमाणात हा प्रकार अजूनही सुरू आहे. ही एक ग्लॅमर लाइन आहे. त्यामुळे येथे असे प्रकार होतच नाही, याविषयीचे मी कधीही समर्थन करणार नाही. त्यातच या क्षेत्रावर मीडियाचे बारीक लक्ष असल्याने असे प्रकार सातत्याने समोर येत आहेत.
पुढे बोलताना क्षमाने म्हटले की, ‘मला माझ्या आई-वडिलांनी शिकविले की, जर प्रामाणिकपणे काम मिळाले तरच करायचे. मी माझ्या करिअरमध्ये मोठमोठ्या दिग्दर्शकांबरोबर याविषयीचा सामना केला. कदाचित याच कारणामुळे माझ्याकडे अद्यापपर्यंत एकही मोठा चित्रपट नाही. बारा वर्षांची असताना, मिटिंगला जात असे. तेव्हा मला याचा अर्थ कळत नव्हता. लोक माझ्या मांडीवर हात ठेवायचे तेव्हा मला काही विशेष वाटत नव्हते. मी त्या लोकांच्या वयाचा विचार करून त्यांना अंकल म्हणायचे. परंतु जेव्हा गडबड वाटायचे तेव्हा त्यांना स्माइल देत उठून जायचे,’ असेही शमाने सांगितले.
शमाने याविषयीचा एक किस्सा सांगताना म्हटले की, ‘एकदा मी एका मोठ्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी मला साइनही केले. मात्र शूटच्या दिवशी त्यांनी याविषयी घूमजाव केला. त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितले की, निर्मात्यांनी तुझ्याऐवजी दुसºया अभिनेत्रीची निवड केली आहे. तुला माहीत आहे, या भूमिकेसाठी किती मोठ्या अभिनेत्रीची निवड केली आहे? जर तुला ही भूमिका हवी असेल तर त्यासाठी तुला काहीतरी करावे लागेल. मला हे कळून चुकले होते की, त्यांना नेमके काय म्हणायचे आहे. मी त्यांना लगेचच उत्तर दिले, सर तुमच्याविषयी माझ्या मनात खूप आदर आहे. परंतु आता अजिबातच नाही.’