Shocking : ‘या’ गॅगस्टरने कोर्टाच्या आवारातच सलमान खानला दिली जिवे मारण्याची धमकी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 04:38 PM2018-01-05T16:38:47+5:302018-01-05T22:08:47+5:30
बॉलिवूडचा टायगर सलमान खान याला जिवे मारण्याची धमकी दिली गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. झी हिंदुस्तानच्या वृत्तानुसार गॅगस्टर ...
ब लिवूडचा टायगर सलमान खान याला जिवे मारण्याची धमकी दिली गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. झी हिंदुस्तानच्या वृत्तानुसार गॅगस्टर लॉरेंस विश्नोई याने जोधपूरच्या न्यायालयातच सलमानला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक यशस्वी अभिनेता म्हणून ओळख निर्माण करणारा सलमान नेहमीच वादाच्या भोवºयात सापडत असतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून तो आपल्या करिअरवर विशेष लक्ष देताना दिसून येत आहे. त्याच्यावरील बहुतांश न्यायालयीन प्रकरणे निकाली निघाल्याने आता तो यापासून चार हात लांब राहण्याचा विचार करीत आहे, परंतु फिरून-फिरून तो त्याचठिकाणी येत असल्याने, त्याच्यामागील वाद संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, झी हिंदुस्तानच्या वृत्तानुसार, गॅगस्टर लॉरेंस विश्नोई याने जोशपूरच्या न्यायालयातच सलमानला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. लॉरेंस विश्वोईने सलमानला धमकी देताना म्हटले की, ‘मी सलमानला जोधपूरमध्येच जिवे मारणार आहे.’ विशेष म्हणजे याबाबतचा एक व्हिडीओदेखील समोर आला असून, त्यामध्ये हा संपूर्ण प्रकार बघावयास मिळत आहे. गेल्या गुरुवारी सलमान जोधपूर न्यायालयात हजर झाला होता. १९९८ मधील काळवीट शिकार प्रकरणी त्याला न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले होते.
जेव्हा सलमान जोधपूर न्यायालयात पोहोचला तेव्हा गॅगस्टर लॉरेंस विश्नोई यालादेखील एका खटल्याच्या सुनावणीसाठी पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. लॉरेंस विश्नोईवर खंडणीचे बरेचसे गुन्हे दाखल असून, याचप्रकरणी त्याला न्यायालयात हजर केले होते. यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला. ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगदरम्यान सलमानने काळविटाची शिकार केल्यापासून त्याच्यावर हा खटला सुरू आहे. या खटल्याची अंतिम सुनावणी १३ सप्टेंबरला होणार आहे.