Shocking : दरोडेखोरांच्या हल्ल्यात जितू वर्माचा डोळा थोडक्यात बचावला!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2017 11:13 AM2017-04-01T11:13:09+5:302017-04-01T16:43:09+5:30

‘सन आॅफ सरदार’, ‘बोल बच्चन’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता जितू वर्मा सध्या मुंबई येथील एका हॉस्पिटलमध्ये ...

Shocking: Jitu Verma's eye saved briefly in the attack of robbers !! | Shocking : दरोडेखोरांच्या हल्ल्यात जितू वर्माचा डोळा थोडक्यात बचावला!!

Shocking : दरोडेखोरांच्या हल्ल्यात जितू वर्माचा डोळा थोडक्यात बचावला!!

googlenewsNext
न आॅफ सरदार’, ‘बोल बच्चन’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता जितू वर्मा सध्या मुंबई येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आता तुम्ही म्हणाल की, शूटिंगदरम्यान जीतूला दुखापत झाली असल्याने कदाचित तो उपचार घेत असावा. मात्र तसे न घडता एका भयानक घटनेचा त्याला सामना करावा लागला, ज्यामध्ये तो थोडक्यात बचावला. 



त्याचे झाले असे की, गेल्या गुरुवारी जितू वर्मा माउंट आबू येथील जंगलात दरोडेखोरांच्या तावडीत सापडला होता. यावेळी दरोडेखोरांनी त्याला बेदम मारहाण केली. ज्यात तो गंभीर दुखापतग्रस्त झाला. त्याच्या एका डोळ्याला जबरदस्त मार लागला. डोळ्याच्या वरच्या बाजूला जवळपास १० टाके पडलेत. तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे जितू प्रचंड घाबरला आहे. जितू माउंट आबू येथून जयपूरला परत येत होता. रस्त्यात चित्तौडगढजवळ काही दरोडेखोरांनी त्याच्या कारवर तुफान दगडफेक केली. घाबरलेल्या जितूच्या ड्रायव्हरने कार जोरात पळवायला सुरुवात केली. जितू ड्रायव्हरच्याच बाजूला बसलेला असल्यामुळे एक दगड काच फोडून त्याच्या डोळ्याच्या वरच्या बाजूला लागला.

मात्र अशातही ड्रायव्हरने कार थांबविली नाही. त्याने प्रसंगावधान लक्षात घेऊन घटनास्थळावरून कार जोरात पळविली. एका टोलनाक्यावर ड्रायव्हरने कार थांबविली असता, जितूच्या कपाळावरून भयंकर रक्त वाहत होते. ड्रायव्हरने ताबडतोब पोलिसांना याबाबतची माहिती दिली अन् उदयपूरमार्गे थेट मुंबई गाठली. मुंबईत येताच त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जितूच्या डोळ्याच्या वरच्या बाजूला खोलवर जखम असल्याने त्याला दहा टाके पडलेत. 



दरम्यान, या हल्ल्याचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. जितूने नुकतेच काही चित्रपटांची शूटिंग पूर्ण केली आहे. शिवाय जितू घोडस्वारीचे ट्रेनिंग देण्यासाठी एका शाळेमध्येदेखील जात असतो. जितूने दिलेल्या माहितीनुसार याच दिवसांदरम्यान आणखी दोन लोकांवर अशाप्रकारचा हल्ला झाला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 

Web Title: Shocking: Jitu Verma's eye saved briefly in the attack of robbers !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.