Shocking ! दिग्दर्शकाबरोबर एक रात्र घालवण्यासाठी नकार दिला होता 'या' अभिनेत्रीने, म्हणून गमवावे लागले बड्या बॅनरचे प्रोजेक्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 12:55 PM2019-12-04T12:55:27+5:302019-12-04T12:58:30+5:30
नरगिसने बॉलिवूडमध्ये न्युड सीन, सेक्स सीन देण्यास कंम्फर्टेबल नसल्यामुळे अशा ऑफर्स स्विकारत नसल्याचेही तिने म्हटले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊच आणि लैंगिक शोषणाचे आरोप कायम होत असतात. संधी मिळावी यासाठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांकडून कास्टिंग काऊच किंवा लैंगिक शोषण झाल्याचा आरोप अनेक अभिनेत्रींनी केला आहे. सोशल मीडियावर #metoo च्या माध्यमातून अनेक अभिनेत्रींनी आपल्यासोबत झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली होती. # meetoo अभियानामुळे अनेक अभिनेत्री सोशिअल मीडियावर न घाबरता बिनधास्त आपल्या भावना आणि घडलेले प्रसंग शेअर जाताना दिसत आहेत. यात आणखीन एका अभिनेत्रीची भर पडली आहे. या अभिनेत्रीच नाव आहे नरगिस फाकरी.
नुकताच तिने धक्कादायक खुलासा केला आहे. रॉकस्टार सिनेमातून नरगिस फाकरीने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. रणबीर कपूरह ती या सिनेमात झळकली होती. गेल्या काही दिवसांपासून नरगिस कोणत्याही सिनेमात झळकलेली नाही. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने आपली आपबीती सांगितली आहे. तिचा व्हिडीओ समोर येताच पुन्हा एकदा लैंगिक शोषणाचा मुद्दा समोर आला आहे. दिलेल्या मुलाखतीत तिने झगमगत्या दुनियेचे वास्तव मांडले आहे.
करिअरच्या सुरूवातीलाच नरगिसला प्लेबॉय मॅगेजिनसाठी ऑफर मिळाली होती. प्लेबॉय हा मॉडेलिंगसाठी मोठा ब्रँड असून त्यातून खूप चांगले पैसेही मिळाले असते. मात्र अशा कोणत्याच गोष्टी करायच्या नव्हत्या ज्याने माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातील. त्यामुळे तिने ही ऑफर धुडकवल्याचे सांगितले. इतकेच नाही तर करिअरच्या सुरूवातील अशा अनेक ऑफर्स आल्या ज्यात दिग्दर्शकांनी तिला कॉम्प्रमाईज करायला सांगितले. अशा कित्येक नावाजलेल्या दिग्दर्शकांना नरगिसने थेट नकार देत या गोष्टींपासून लांबच राहणे पसंत केले.
बॉलिवूडमध्ये भूमिकेची गरज असली तरीही न्युड सीन, सेक्स सीन देण्यास कंम्फर्टेबल नसल्यामुळे अशा ऑफर्स स्विकारत नसल्याचेही तिने म्हटले आहे. त्यामुळे असे अनेक मोठे प्रोजेक्ट मी सोडले आहेत. पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी अशा प्रकारचे काम करण्यापेक्षा थोडक्या आणि चांगल्या ऑफर्स स्विकारण्याकडे माझा कल असतो असेही तिने म्हटले आहे.