गाजत असलेल्या 'आर्टिकल 370' वर 'या' ठिकाणी घातली बंदी, निर्मात्यांना मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 12:55 PM2024-02-26T12:55:57+5:302024-02-26T12:57:28+5:30
भारतात गाजलेल्या 'आर्टिकल 370' सिनेमावर बंदी घालण्यात आलीय. त्यामुळे सिनेमाच्या कमाईत मोठं नुकसान होणार आहे.
यामी गौतमचा 'आर्टिकल 370' (Article 370) सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. भारतात २०१९ साली आर्टिकल 370 हटवण्यात आलं. आणि एक मोठी राजकीय घटना घडली. याच मुद्द्यावर आधारीत 'आर्टिकल 370' सिनेमा पाहायला मिळतोय. कथानकाची व्यवस्थित मांडणी आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे 'आर्टिकल 370' चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. सध्या गाजत असलेल्या 'आर्टिकल 370' वर मात्र काही ठिकाणी बंदी घालण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
'आर्टिकल 370' सिनेमावर आखाती देशांमध्ये (Gulf countries) बंदी घालण्यात आलीय. आखाती देशांमध्ये भारतीय सिनेसृष्टीचं मोठं योगदान आहे. त्यामुळे या देशांमध्ये 'आर्टिकल 370' वर बंदी घालणं हा सर्वांसाठी धक्का आहे. बंदीचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाहीय. परंतु यामुळे 'आर्टिकल 370' च्या कमाईवर निश्चितच परिणाम होईल, असं दिसतंय.
#Article370Film gave me goosebumps throughout the movie “was, is and always will be” what an emotional dialogue and moment.@yamigautam what a performance truly Indian 🇮🇳 #Priyamani you were brilliant. What a movie!! Must watch!!! @AmitShah@narendramodi thank you 4 uniting India pic.twitter.com/uVU55ogPLi
— Hardik Dhebar 🇮🇳 (@Dhebar_Hardik) February 25, 2024
सध्या 'आर्टिकल 370' भारतात चांगली कमाई करत आहे. सिनेमा रिलीज झाल्यावर आजपर्यंत विकेंडला 'आर्टिकल 370' सिनेमाने ३४ कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय. जिओ स्टूडिओज आणि आदित्य धर यांनी 'आर्टिकल 370' सिनेमाची निर्मिती केलीय. सिनेमात यामी गौतम, प्रियामणी, अरुण गोविल, किरण करमरकर, वैभव तत्तवादी या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.