पद्मिनी कोल्हापुेरेने इतक्या वर्षानंतर केला लग्नाबाबत धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 09:00 PM2021-08-28T21:00:17+5:302021-08-28T21:08:54+5:30
पद्मिनी कोल्हापुरे यांनी निर्माते टूटू उर्फ प्रदीप शर्मासोबत लग्न करत संसार थाटला. 14 ऑगस्ट 1986ला दोघांनी लग्न केले होते.
पद्मिनी कोल्हापूरे... हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री. प्रेम रोग, आहिस्ता आहिस्ता, वो सात दिन, विधाता अशा विविध सिनेमातील भूमिकांनी पद्मिनी कोल्हापूरे यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील निरागसपणा, आकर्षक आणि घायाळ करणारं सौंदर्य यामुळे 80च्या दशकात पद्मिनी कोल्हापूरे यांची वेगळीच जादू होती. मात्र पद्मिनी कोल्हारपूरे या अभिनयाच्या क्षेत्रात अपघातानेच आल्या.
आपल्या आत्या लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्याप्रमाणे गायिका बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं. फक्त नशीब आजमावण्यासाठी त्या सिनेमात आल्या होत्या. मात्र नंतरच्या काळात सिनेमा आणि अभिनयच त्यांचं जणू आयुष्य बनलं.
पद्मिनी कोल्हापुरे यांनी निर्माते टूटू शर्मासोबत लग्न करत संसार थाटला.कपिल शर्मा शोमध्ये पद्मिनी यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी लग्नाबद्दल एक खुलासा केला होता. कपिल शर्माने पद्मिनी यांना विचारले की, टूटू उर्फ प्रदीप शर्मा यांनी तुम्हाला पेमेंटच दिले नव्हते. यावर पद्मिनी यांनी हसत हसत म्हटले की, म्हणूनच त्यांच्यासोबत लग्न करत मी त्याच गोष्टीचा सूड घेतलाय.
दोघांची भेट १९८६ साली 'ऐसा प्यार कहा' सिनेमाच्या सेटवर झाली होती. दोघांमध्ये मैत्री झाली नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र पद्मिनी यांच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते. दोन्ही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने कुटुंबाचा या लग्नासाठी विरोध होता. दोघांनी पद्मिनीच्या कुटुंबीयांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु ते राजी झाले नाही. अखेर एकेदिवस पद्मिनी प्रदीपसोबत पळून गेली आणि 14 ऑगस्ट 1986ला दोघांनी लग्न केले. त्यांना एक मुलगा आणि त्याचे नाव प्रियांक आहे.
पद्मिनी यांना अभिनयाची नाही तर गाण्याची फार आवड होती. मात्र त्यांच्या आजीची इच्छा होती पद्मिनी यांनी अभिनेत्री व्हावे. वयाच्या १७ -१८ वर्षाची आईची भूमिका साकारली होती. या वयात आईपण काय असते हेच कळत नव्हतं. त्या वयात ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारणे नक्कीच आव्हानात्मक होते.१९७४ सालीच एक खिलाडी बावन पत्ते सिनेमातून पद्मिनी यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. वयाच्या ९ वर्षाच्या असनाच त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. पुढे अभिनेत्री म्हणून त्या नावारुपाला आल्या. आजही पद्मिनी कोल्हापुरे यांची जादू कायम आहे.