Shocking : ​...म्हणून सचिन गेला नाही कपिलच्या शोमध्ये !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2017 11:09 AM2017-05-27T11:09:36+5:302017-05-27T16:39:36+5:30

विनोदी कपिल शर्माचा शो म्हणजे चित्रपटाच्या प्रमोशनचे हक्काचं व्यासपीठ. या शोमध्ये कुणी सहभागी झाले नाही, असे आपणास आठवतही नसेल. ...

Shocking: ... as Sachin did not go to Kapil's show! | Shocking : ​...म्हणून सचिन गेला नाही कपिलच्या शोमध्ये !

Shocking : ​...म्हणून सचिन गेला नाही कपिलच्या शोमध्ये !

googlenewsNext
नोदी कपिल शर्माचा शो म्हणजे चित्रपटाच्या प्रमोशनचे हक्काचं व्यासपीठ. या शोमध्ये कुणी सहभागी झाले नाही, असे आपणास आठवतही नसेल. कारण मोठमोठे स्टार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावतात. मात्र क्रिकेटच्या देवाचा अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा चित्रपट काल देशभरात प्रदर्शित झाला. मात्र या बायोपिकच्या प्रमोशनसाठी सचिनने कपिलच्या शोमध्ये चक्क पाठ फिरवल्याचे दिसले. दरम्यान, कपिल आणि सचिनच्या चाहत्यांना याविषयी नक्कीच प्रश्न पडला असणार आहे.
सचिनने शोमध्ये यावे, यासाठी कपिलच्या टीमने सर्वोतोपरी प्रयत्न केले. कपिल शमार्चा सहकारी सुनील ग्रोव्हरने शोला रामराम ठोकल्यापासून या शोची लोकप्रियता कमी झाल्याचेही बोलले जाते. त्यामुळे सचिनच्या निमित्ताने या शोला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात प्रेक्षक मिळण्याची शक्यता होती. मात्र तसे काही झाले नाही. सचिन ए बिलीयन ड्रीम्सचे प्रमोशन कोणत्याही हिंदी कार्यक्रमात केले जाणार नाही, असे सचिनने अगोदरच प्रोडक्शनला सांगितल्याचे बोलले जाते. त्यामुळेच सचिन कपिलच्या शोमध्येही दिसला नाही. दरम्यान सचिनने प्रमोशनसाठी मराठी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता, शिवाय मराठी वृत्तवाहिन्यांनाही मुलाखत दिली आहे. सचिन ए बिलीयन ड्रीम्स हा सिचत्रपट काल हिंदी आणि मराठीसह इतर पाच भाषेत प्रदर्शित झाला असून संपूर्ण राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे.

Also Read : ​‘बायोपिक’ सर्वात अवघड इनिंग : सचिन तेंडुलकर
                    : OMG : ​सचिन तेंडुलकरचा चित्रपट पाहून अमिताभ बच्चन बोलले असे काही..!

Web Title: Shocking: ... as Sachin did not go to Kapil's show!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.