Shocking : सलमान खानने आमीर खानला मारला टोमणा; काय म्हटले वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2017 02:20 PM2017-06-14T14:20:54+5:302017-06-14T19:50:54+5:30

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आपल्या बेधडक अंदाजासाठी ओळखला जातो. त्याला कुठलाही प्रश्न विचारा त्याचे तो असे काही उत्तर देतो ...

Shocking: Salman Khan kills Aamir Khan; What a great deal to say! | Shocking : सलमान खानने आमीर खानला मारला टोमणा; काय म्हटले वाचा सविस्तर!

Shocking : सलमान खानने आमीर खानला मारला टोमणा; काय म्हटले वाचा सविस्तर!

googlenewsNext
लिवूडचा दबंग सलमान खान आपल्या बेधडक अंदाजासाठी ओळखला जातो. त्याला कुठलाही प्रश्न विचारा त्याचे तो असे काही उत्तर देतो की, समोरचा थक्क होतो. सध्या सलमान त्याच्या आगामी ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, त्याला सातत्याने माध्यमांशी संवाद साधावा लागत आहे. शिवाय तो दररोज असे काही वक्तव्य करीत आहे की, ज्यामुळे तो माध्यमांमधील ठळक बातम्यांमध्ये झळकत आहे. यावेळी त्याला जेव्हा बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याच्याविषयी विचारण्यात आले तेव्हा त्याने दिलेले उत्तर दंग करणारे होते. खरं तर हा आमीरला एकप्रकारचा टोमणाच त्याने मारला होता. 

तुम्हाला हे तर माहीतच आहे की, सलमानच्या लग्नाचा मुद्दा एखाद्या राष्टÑीय मुद्द्याप्रमाणे आहे. ज्यामुळे तो सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असतो. याच मुद्द्यावर बोलताना काही काळापूर्वी आमीर खानने म्हटले होते की, ‘तो सलमानचे हातपाय बांधून त्याचे लग्न लावून देणार आहे.’ आता आमीरच्या या वक्तव्यावर पलटवार करण्याची सलमानची वेळ होती. सलमाननेही आमीरच्याच शैलीत उत्तर देताना म्हटले की, ‘होय, मी आमीरचे वक्तव्य कुठे तरी वाचले होते. आमीरने माझ्याविषयी असेच काहीसे म्हटले होते. तो माझे हातपाय बांधू इच्छितो, जेणेकरून माझे तो लग्न करू शकेल. त्याच्या या वक्तव्याविषयी मी एवढेच बोलू इच्छितो की, मीदेखील त्याचे हातपाय बांधून ठेवणार आहे. जेणेकरून तो तिसºयांदा लग्न करू शकणार नाही.’ 

आता तुम्ही लगेचच असा विचार करू नका की, पुढील काळात या दोन सुपरस्टारमध्ये घमासान बघावयास मिळेल. वास्तविक सध्या हे दोघेही बॉलिवूडमधील सुपरस्टार असून, त्यांच्यातील नाते खूपच चांगले आहे. ते नेहमीच अशा पद्धतीने एकमेकांविषयी बोलत असतात. त्यामुळे सलमानने दिलेले उत्तर आमीर खूपच मनावर घेईल असे म्हणणे जरा घाईचेच ठरेल. कदाचित तोही सलमानप्रमाणेच अशाच काहीशा मस्करीच्या अंदाजात त्याला उत्तर देईल. 

असो, सलमान खानने लवकरच लग्न करावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. त्यामुळे केवळ आमीरलाच सलमानच्या लग्नाची चिंता सतावत आहे, असे म्हणता येणार नाही.  आता सलमान केव्हा विवाहाच्या बंधनात अडकेल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.  

Web Title: Shocking: Salman Khan kills Aamir Khan; What a great deal to say!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.