सोशल मीडियावर व्हायरल होतेय या साऊथ अ‍ॅक्टरच्या निधनाचं खोटं वृत्त, चाहते संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 05:25 PM2019-07-29T17:25:45+5:302019-07-29T17:26:16+5:30

कित्येक वेळा कलाकारांच्या निधनाच्या अफवा देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात.

shocking south superstar vijay fake death news trending on twitter makes fans so angry | सोशल मीडियावर व्हायरल होतेय या साऊथ अ‍ॅक्टरच्या निधनाचं खोटं वृत्त, चाहते संतापले

सोशल मीडियावर व्हायरल होतेय या साऊथ अ‍ॅक्टरच्या निधनाचं खोटं वृत्त, चाहते संतापले

googlenewsNext

सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टींव्यतिरिक्त निगेटिव्ह गोष्टींसाठीदेखील केला जातो. कित्येक वेळा कलाकारांच्या निधनाच्या अफवा देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यात आता दाक्षिणात्य स्टार विजयबाबतदेखील अशी अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही अफवा वाऱ्यासारखी पसरत असून त्यांचे चाहते दुःखी झाले आहेत. ट्विटरवर #RIPactorVIJAY ट्रेंड करत आहे. विजयचे चाहते त्याच्या निधनाच्या अफवांमुळे संतापले आहेत. 


दाक्षिणात्य अभिनेता चित्रपटसृष्टीतील मोठा स्टार आहे. त्याचे बॅक टू बॅक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. मागील काही वर्षांत विजयचा फॅनफॉलोविंग खूप वाढला आहे. सध्या विजय आगामी चित्रपट बिजिलमुळे खूप चर्चेत आला आहे.

यादरम्यान त्याचा द्वेष करणाऱ्या लोकांनी त्याच्या निधनाचे वृत्त व्हायरल केले. त्याच्या निधनाचे वृत्त ऐकून चाहत्यांना सुरूवातीला धक्का बसला. मात्र जेव्हा हे वृत्त चुकीचं असल्याचं समजल्यावर चाहते खूप भडकले. 


विजय स्वस्थ आणि फिट आहे. त्याला काहीही झालेलं नाही. #RIPactorVIJAY या हॅशटॅग अंतर्गत आता ५० हजारांहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. लोक विचारत आहेत की, कोण आहे जो हे ट्रेंड करत आहे. हे हॅशटॅग बंद करा.




अभिनेता विजय आगामी चित्रपट बिजिलमध्ये फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाला ए आर रेहमान यांनी संगीत दिलं आहे.



 

या चित्रपटातील विजयच्या लूकचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत आणि त्याच्या लूकला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.

Web Title: shocking south superstar vijay fake death news trending on twitter makes fans so angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.