SHOCKING : ...या अभिनेत्रींच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा केला गेला प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2017 05:33 PM2017-02-21T17:33:20+5:302017-02-21T23:03:20+5:30

दररोज महिलांसोबत फिजिकल एब्यूज आणि सेक्शुअल हॅरेसमेंटसारख्या घटना घडत असल्याचे समोर येते. मात्र याचा फटका सामान्यालाच बसला असे नाही, ...

SHOCKING: ... Tried to touch the actress's private party | SHOCKING : ...या अभिनेत्रींच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा केला गेला प्रयत्न

SHOCKING : ...या अभिनेत्रींच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा केला गेला प्रयत्न

googlenewsNext
रोज महिलांसोबत फिजिकल एब्यूज आणि सेक्शुअल हॅरेसमेंटसारख्या घटना घडत असल्याचे समोर येते. मात्र याचा फटका सामान्यालाच बसला असे नाही, तर ग्लॅमरच्या झगमगाटात वावरणाºया अभिनेत्रींनादेखील बसला आहे. साउथ अभिनेत्री वराहलक्ष्मी शरदकुमार हिला सेक्शुअल हॅरेसमेंटचा सामना करावा लागल्याची नुकतीच धक्कादायक घटना समोर आली असून, यापूर्वीही वराहलक्ष्मीप्रमाणेच इतरही काही अभिनेत्रींना अशा घटनांचा सामना करावा लागला आहे. यातील काही अभिनेत्रींच्या तर चक्क प्रायव्हेट पार्टला हात लावण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अर्थातच हा प्रकार काही अतिउत्साही फॅन्सकडून केला गेला. खरं तर सेलिब्रेटी आणि फॅन्स यांचे अतुट नाते असल्याने त्यांना नेहमीच फॅन्सच्या घोळक्यात वावरावे लागते. मग प्रमोशन असो वा इव्हेंट, सेलिब्रेटी नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांच्या फॅन्सला भेटण्यासाठी जात असतात. परंतु यात काही असेही उत्साही फॅन्स असतात, जे कळत-नकळत असा काही कारनामा करून जातात, ज्याची ते सेलिब्रेटी कल्पनादेखील करू शकणार नाही. विशेषत: अ‍ॅक्ट्रेसच्या बाबतीत असे प्रसंग नेहमीच घडत असून,  साउथमधील बºयाचशा अशा अभिनेत्री आहेत ज्यांना अशा गलिच्छ प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा...



नमिता 
साउथ अभिनेत्री नमिता हिला एकदा नव्हे तर दोनदा अशा प्रसंगाचा सामना करावा लागला. २००७ मध्ये चेन्नई येथे आयोजित केलेल्या एका प्रायव्हेट फंक्शनमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या नमिताला गर्दीतील एका गु्रपने तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या नमिताने तेथून पोबारा करण्याचा प्रयत्न केला, यात ती किरकोळ जखमीही झाली होती. नमितासोबत असाच काहीसा प्रसंग बेंगळुरू येथेही घडला होता. 



नयनतारा 
चेन्नई येथील एका शाळेत आयोजित केलेल्या फंक्शनदरम्यान अभिनेत्री नयनतारा हिला काही उत्साही मंडळींकडून जबरदस्त मनस्ताप सहन करावा लागला. नयनतारा कार्यक्रमस्थळी पोहचताच गर्दीतील काही लोक असे काही चवताळले की, त्यांनी थेट स्टेजवर जाऊन नयनताराला भेटण्याचा प्रयत्न केला. यातील काहींनी तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला. 



मुमैथ खान
आयटम गर्ल म्हणून ओळख असलेल्या मुमैथ खान हिच्यासोबत घडलेला प्रसंग अंगावर शहारे आणणारा आहे. जेव्हा ती एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबली होती तेव्हा काही लोकांनी तिच्याकडे बघून अश्लील इशारे केले. एवढेच नव्हे तर तिच्यावर अश्लील कमेंट्सदेखील केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुमैथ हिने लगेचच हॉटेल प्रशासनाकडे मदत मागितली. 



प्रियमणी
साउथमधील हॉट अभिनेत्री प्रियमणी हिलादेखील अशाप्रकारच्या छेडछाडीचा सामना करावा लागला. सेलिब्रेटी क्रिकेट लीगच्या (सीसीएल) पार्टीत प्रियमणी उपस्थित होती. यावेळी काही सेलिब्रेटी क्रिकेटरनेच नशेमध्ये तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी हे प्रकरण चांगलेच गाजले होते. 



इलियाना डिक्रूज
साउथबरोबरच बॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण करणाºया इलियाना डिक्रूज हिने स्वत:च अशाप्रकारच्या प्रसंगाचा सामना करावा लागल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचे झाले असे की, काही दिवसांपूर्वीच एक मुलीने सोशल मीडियावर एक आर्टिकल शेअर केले होते. ज्यामध्ये म्हटले होते की, मी माझ्या एक्स बॉयफ्रेंडचे अश्लील मॅसेजेस सर्वांसमोर एक्सपोज करीत आहे. तो मला ब्लॅकमेल करीत आहे. त्यामुळे माझ्याकडे आता दुसरा पर्याय नाही. हा मॅसेज इलियानाच्या वाचण्यात आला. तिने लगेचच त्या मुलीचे समर्थन करीत म्हटले की, मीदेखील अशाप्रकारच्या घटनेला बळी पडले आहे. मात्र मी स्वत:ला नशीबवान समजते की माझ्या पालकांनी मला यातून बाहेर काढले. शिवाय मला अशा कठीण प्रसंगांचा सामना करण्याचे बळ दिले. 



लक्ष्मी राय

पौंडिचेरी येथे एका गाण्याच्या शूटिंगसाठी लक्ष्मी राय गेली असता, काही फॅन्स शूटिंग बघण्यासाठी अन् तिचा आॅटोग्राफ घेण्यासाठी सेटवर धडकले होते. गर्दीचा फायदा घेऊन काही लोक लक्ष्मीबरोबर फिजिकल होण्याचा प्रयत्न करीत होते. ही बाब जेव्हा क्रू मेंबर्सला कळाली तेव्हा त्यांनी लगेचच या मंडळींचा समाचार घेतला. मात्र या प्रकारामुळे लक्ष्मी प्रचंड घाबरली होती. 



जेनेलिया डिसूजा
हैद्राबाद येथे आयोजित केलेल्या एका इव्हेंटदरम्यान जेनेलियाला छेडछाडीच्या घटनेचा सामना करावा लागला. बाउंसर आणि पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त असतानाही एक फॅन्स तिच्या जवळ पोहचला अन् तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी जेनेलियाने त्या फॅन्सच्या जोरदार श्रीमुखात भडकावली होती. मात्र या प्रकारामुळे ती घाबरली होती. 



सुरवीन चावला
‘हेट स्टोरी-२’मध्ये आपल्या बोल्डनेसने एकच खळबळ उडवून देणाºया सुरवीन चावला हिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागल्याचे तिनेच म्हटले होते. अर्थात या प्रसंगाला तिला बॉलिवूडमध्ये नव्हे तर साउथ इंडस्ट्रीमध्ये बळी पडावे लागले. 



हंसिका मोटवानी

कोयम्बतूर येथे आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये हंसिका मोटवानी पोहचली होती. हंसिकाची एक झलक पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीतील काही लोकांनी तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे हंसिका किरकोळ जखमीही झाली होती. 



समांथा रु थ प्रभू
तिरुपती येथे एका प्रायव्हेट शोच्या इनॉगरेशनसाठी पोहचलेल्या समांथासोबत तीन मुलांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे समांथा प्रचंड घाबरली होती. तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. हे बघून तिन्ही आरोपी तेथून पसार झाले. २०११ मध्ये ही घटना घडली होती. 



श्रिया सरन
२००८ मध्ये तिरुमाला मंदिरात श्रियाला छेडछाडीच्या प्रकाराचा सामना करावा लागला. पूजा करून मंदिरातून परतत असलेल्या श्रियाशी एका व्यक्तीने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या श्रियाने त्या व्यक्तीच्या श्रीमुखातही लगावली होती. 



ज्योतिका
एका पब्लिक इव्हेंटदरम्यान ज्योतिकाला छेडछाडीचा सामना करावा लागला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यानंतर हा व्हिडिओ इंटरनेटवर वाºयासारखा व्हायरल झाला होता. 



रिया चक्रवर्ती 
‘मेरे डॅड की मारुती’फेम रिया चक्रवर्ती हिच्यासोबत २०१४ मध्ये असाच काहीसा प्रकार घडला होता. रियाने ट्विटरवर याविषयीचा उलगडा केला होता. तिने म्हटले होते की, एक व्यक्ती अचानक तिच्या बिल्डिंगमध्ये आला अन् तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र मी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतलेले असल्याने मी त्याला एक जोरदार किक मारून त्याला पळवून लावले. 



श्वेता मेनन
मल्याळम इंडस्ट्रीची प्रसिद्धी अभिनेत्री श्वेता मेनन हिच्यासोबत एका इव्हेंटदरम्यान खासदारानेच छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर श्वेताने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रारही दिली. त्यानंतर संबंधित खासदाराने तिची जाहीर माफी मागितली. पुढे श्वेताने तिची तक्रार मागे घेतली. 



सोना

अभिनेत्री सोना हिच्याबरोबर प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रह्मण्यम् यांचा लहान मुलगा एसपी चरण याने छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. सोनाच्या मते, एसपी चरण याने सेक्सुअली हॅरेस करण्याचा प्रयत्न केला होता. हा संपूर्ण प्रकार वेंकट प्रभू याच्या पार्टीत समोर आला होता. 

Web Title: SHOCKING: ... Tried to touch the actress's private party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.