शेवटच्या दिवसात गब्बरचे झाले अतोनात हाल; एका अपघाताने उद्धवस्त झालं अमजद खानचं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 05:56 PM2023-04-07T17:56:02+5:302023-04-07T17:56:59+5:30
Amjad khan: शुटिंगसाठी उशीर व्हायला नको यासाठी ते कारने गोव्याच्या दिशेने रवाना झाले, आणि येथेच त्यांचा घात झाला
बॉलिवूडच्या इतिहासात अजरामर झालेला सिनेमा म्हणजे शोले. या सिनेमातील प्रत्येक पात्र सुपरहिट ठरलं. त्यातलीच एक भूमिका म्हणजे गब्बर. अभिनेता अमजद खान यांनी साकारलेली गब्बर ही खलनायिकी भूमिका तुफान गाजली. 'ये हाथ मुझे दे दो ठाकुर', कितने आदमी थे यासारख्या त्यांचे डायलॉग्स तर आजही लोकप्रिय असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे पडद्यावर गब्बरची भूमिका अजरामर करणाऱ्या अमजद खान यांचे खऱ्या आयुष्यात आतोनात हाल झाले. एका अपघातामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्धवस्त झालं.
अमिताभ बच्चन यांच्या 'द ग्रेट गॅम्बलर' या सिनेमामध्ये अमजद खानदेखील झळकणार होते. या सिनेमाचं गोव्यात शुटिंग होणार होतं, त्यामुळे अमजद खान गोव्याच्या दिशेने रवाना झाले. मात्र, त्याच काळात त्यांचा भीषण अपघात झाला.
गोव्याला जाण्यासाठी अमजद खान निघाले मात्र, त्यांची फ्लाइट मिस झाली. त्यामुळे शुटिंगसाठी उशीर व्हायला नको यासाठी ते कारने गोव्याच्या दिशेने रवाना झाले. यावेळी त्यांचं संपूर्ण कुटुंबदेखील त्यांच्यासोबत होतं. मुंबई-गोवा अंतर जास्त असल्यामुळे त्यांनी काही काळासाठी ड्रायव्हरला बाजूला बसायला सांगत. स्वत: गाडीचा ताबा घेतला. परंतु, दुर्दैवाने त्यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की, त्यांच् कारचं स्टिअरिंग अमजद खान यांच्या छातीत शिरलं आणि त्यांच्या बरगड्या मोडल्या.
दरम्यान, अमजद खान यांना तात्काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखलही करण्यात आलं. मात्र, एका मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना अपंगत्व आलं. कित्येक वर्ष ते व्हीलचेअरवर बसून होते. त्यामुळे बराच काळ शरीराची हालचाल न झाल्यामुळे त्यांना स्थुलत्व आलं. पर्यायाने त्यांचं वजन प्रचंड वाढलं. इतकंच नाही तर ते पुढे कोमात गेले. विशेष म्हणजे ते कोमातूनही बाहेर आले. मात्र, या दीर्घ आजारामुळे पुढे त्यांचं निधन झालं.